वडवणी तालुका जिल्हा- बीड - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमावर कारवाई करण्याबाबत तहसीलदार वडवणी यांना तेली समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
औरंगाबाद । धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारया नराधमांना फाशी देण्याची मागणी जय संताजी युवा मंच, तेली समाज औरगाबाद, तेली युवा संघटना, राष्ट्रवादी ओबीसी आघाडी, आमदार अतुल सावे मित्रमंडळ, युवा क्रांतीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे करण्यात आली.
श्रीरामपूर तेली समाज श्रीरामपूर तालुका प्रांतिक तेली महासभा भव्य मेळावा श्रीरामपूर तालुका मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक २७/३/२०१८ रोजी सकाळी 10.00 वा. आयोजित केले आहे, उद्घाटक - मा.श्री.चंद्रकांतजी वाव्हळ मा.श्री.नानासाहेब जाधव,
घोटी यथे तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा येथे एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला. त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा घोटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
शिंदखेडा, दि.१९ (प्रतिनिधी) - दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मोर्चा काढून रास्तारोकोचा इशारा शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.