महाराष्टृ प्रांतीक तैलिक महासभा रजि.१९९/२०१५
वीरशैव तेली समाज लातूर,व महिला गट
दि.२६.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाजाच्या वतीने प्रतिनिधीत्वांचा सत्कार
दि.२७.२.२०१७ रोजी वीरशैव तेली समाज लातूर च्या वतीने काठी सह गंगेच्या पाणीचा अभिषेक आयोजित सुभाष चौक ते सिध्देश्वर मंदिर भव्य शोभा मिरवणूकित समाजातील महिला जेष्ठ नागरिक व तरुण मंडळी फेटे प्रधान करून लक्षवेधी मिरवणूक वीरशैव तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता....
जि औरंगाबाद सोयगांव तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सोयगांव (जि औरंगाबाद ) येथे साजरी करण्यात आली यावेळी तेली समाज बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व तेली समाज बांधवांनी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे कार्याचा मागोवा घेतला व संत संताजी महाराजांचाा जयजयकार केला.
पैठण - जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांचे पैठण येथे श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा पैठण येथे भव्य मंदीर असुन तेली समाजाची भव्य धर्मशाळा आहे. धर्मशाळा सर्व लोकोपयोगी असुन या धर्मशाळेत दरवर्षी श्री. संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन केले जाते. या वर्षी नाथवंशज श्रीनाथ बुवा गोसावी यांचे अमृतवाणीतुन एकनाथी भागवताचे आयोजन केले आहे.
तेली युवा संघटना आयोजित
प. पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्तभव्य शोभायात्रा
दि. 8 डिसेंबर 2017
आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, सालाबादप्रमाणे संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे योजिले आहे.
या भव्यदिव्य मिरवणूक मध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे ही नम्र विनंती.