जुन्नर तालुका तेली समाज आयोजित व शनैश्वर देवस्थान, आळे संचलित
राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा 2017
आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे वार व वेळ शनिवार दि. 4/11/2017 ,वेळ सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत .
मेळावा स्थळ सौभद्र मंगल कार्यालय ,आळेफाटा, नगर रोड, बॅकऑफ महाराष़्ट्राच्या मागे , ता. जुन्नर जि. पुणे
औरंगाबाद : शहरातील विविध भागांत जाऊन तेली सेनेने गोरगरीब व बेघरांना मिठाई, फटाके वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी काही पोलिसांनी या कार्यक्रमाज सहभागी होऊन सक्रिय हातभार लावला. कार्यक्रमात तेली सेनेच संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, सुनील क्षिरसागर, विनोद मिसाळ, विशाल नांदरकर, अशोक लोखंडे, संतोष सुरूहे आदींचा सहभाग होता.
यांत्रिक दाबाच्या साहाय्याने तेल निर्मीती ( निष्कर्षण ) : मोठ्या प्रमाणावर व तेलाचा उतारा उच्च पडेल अशा तऱ्हेने निष्कर्षण ( तेल निर्मीती करण्यासाठी ) करण्यासाठी यांत्रिक दाबाचा उपयोग केला जातो. शिवाय त्यापूर्वी तेलबियांवर काही प्राथमिक प्रक्रिया करून घ्याव्या लागतात. या पद्धतीत अनेक टप्पे आहेत. सुरूवातीच्या काही लेखात लिहिल्याप्रमाणे बियांच्या नमुन्यांची तपासणी झाली की, चाळणीवजा यंत्रांच्या योगाने त्यांमधील रेवाळ माती, खडे, काटक्या यांसारखे अनिष्ट पदार्थ दूर करतात. साफ करण्याच्या क्रियेतील हा पहिला टप्पा होय.
घोटी : डीजे, डॉल्बी, तसेच वाद्य संस्कृतीला फाटा देत गणेश विसर्जन सोहळ्यात येथील श्री. संताजी महाराज मित्रमंडळ व तेली समाज बांधवांनी अभिनव उपक्रम राबविला. वारकरी दिंडी काढून हरिनामाचा व गणरायाचा गजर करित, तसेच महिला वर्गाने प्रबोधन रॅली काढत सहभाग नोंदवला, घोटी शहरात वर्षभर श्री संताजी मंडळाकडून व समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविले जातात.
जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते.