औरंगाबाद : तेली सेनेच्या वतीने जगनाडे महाराज आयटी पार्कमध्ये तेली समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयटी पार्कचे अध्यक्ष विश्वनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. ह भ प बापूराव सोनवणे, भगवान बागूल, विजय गवळी, डॉ.उज्वल करवंदे, सुनीता मचाले, बबिता राऊत यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. आभार पवार यांनी मानले,
पैठण - संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांच्या सूचक कल्पनेतून गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यावेळी पैठण नगर परिषद अध्यक्ष दत्ता गाडे, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद संदलंबे , उपाध्यक्ष देशमुख महाराज आळंदीकर,
दि.८ डिसेंबर २०१८ रोजी सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व तेलीसमाज बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी आसे आव्हान करण्यात आलेले आहे.
तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले निवेदन
जामनेर : गोंदेगाव (ता-सोयगाव, जि- औरंगाबाद) येथील अल्पवयिन मुलीवर (वय १३ वर्ष ८ महीने) मानवतेला काळिमा फासून २३ वर्षीय तरुणाने मानसिक व शारीरिक अत्याचार करीत तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अश्या मागणीसाठी जामनेरात मूक मोर्चा काढून तहसीलदार नामदेव टिळेकर यांना तेली समाज बांधवांनकडून निवेदन देण्यात आले.
मोहन देशमाने, सौ. केशर काकू गौरव ग्रंथ 31 मे 1992 तुन साभार
सूर्याची कवळी किरणे विजापूरच्या गोल घुमटावर पडली. रात्रभर झोपलेले विजापूर जागे झाले. शहा पेठे जवळच्या घरात रात्रभर जाग होती. आजूबाजूच्या दोन स्त्रिया रात्रभर थांबल्या होत्या. बाहेर ह. भ. प. नामदेव बाळोबा मचाले विठ्ठलाचे नाव घेत बसले होते. जेव्हा अंधारात जगणा-या माणसांना प्रकाश किरण देऊन जगण्याची नवी जिद्द देण्यासाठी सुर्य आपली किरणे घेऊन वर आला.