Sant Santaji Maharaj Jagnade
भिंगार हा नगरचा भाग मोगल काळातही मोगलांचे केंद्र व ब्रिटीश काळातही भिांगर कॅम्प ही इंग्रजांची शक्ती. गावाच्या वेशीजवळ तेलाचे घाणे. घाण्यातले तेल विक्रीसाठी लगेच बाहेर दुकाने. दुकान तरी कसले ढिगा सारखी ठेवलेली पेंड. पातेल्यात तेल संपले इंग्रज अधिकारी येणार पैसे न देता माल नेणार उलट बंदुकीचा धाक. काशिनाथ नामदेव देवकर हा नामदेव देवकरांचा मुलगा. त्या तरूण रक्ताला हे खटकल. गावातील तालमीत येजा त्यात ब्रिटीश विरोधी सुर दिसुन आला. हा जाच आपलाच नाही तर हा जाच या देशाला आहे. आणी तो दुर करण्यास धडपड चालु आहे. ते यात सामिल झाले.
नगरमधील अकोला दुर्गम भाग. अकोला मधील राजुर हे अती दुर्गम. या गावात समाज बर्यापैकी भाऊशेठ पाबळकर हे जागृत बांधव.तेलघानी बारा महिने नसे. इतर वेळी दारातील चार जनवरे डोंगरात घेऊन जावे. दुध मिळे. हे कितीतरी पिढ्या चालले. जुलूमी इंग्रजांनी जंगलेच सरकारी ठरवली. गायरानात बंदी आणली. हा कायदा भंग करण्यास क्रांतीसिंह नाना पाटील यांनी गांधींच्या आदेशावर चरणबिळाशी (सांगली) येथे जंगल सत्याग्रह केला. त्याचे पडसाद येथे ही उमटले. राजूरच्या युवकांनी 1930 मध्ये जंगल सत्याबग्रह करून इंग्रजांच्या कार्याचा भंग केला. त्याबद्दल इंग्रजांनी शिक्षाही दिली. परंतु या जुलूमी राजवटीविरुद्ध जागो जागी बुलेटिन वाटणे, वाचून दाखविणे, आदिवासी लोकांना स्वातंत्र्याचे महत्व सांगणे यात हे आघडीवर होते.
सह्याद्री पर्वताचे उंच शिखर कळसुबाई ते याच भागात सर्वात दुर्गम भाग तो हाच याच अकोले तालुक्यात राजुर हे क्रांतीचे केंद्र इंग्रजांची बारीक नजर एक अटक करावा तर दुसरे दोन निर्माण व्हावेत अशी, अवस्था दत्तात्रय पन्हाळे हे तरूण वयात देश सेवेने भारावून गेले. जंगलातील भूमिगतांना संरक्षण देणे. भाकरी पोहच करणे, प्रभात फेरी व सायंकाळी फेरी काढणे सुरू केले. इंग्रजाच्या वाकड्या नजरेने ते भुमीगत झाले. इंग्रजांची यंत्रणा उडवुन टाकण्यस तारा तोडल्या, भुमिगतांना पकडू नये म्हणुन पूल उडवून टाकले. यातुन 9 महिने शिक्षाही झाली. शिक्षा संपल्या नंतर बुलेटिन वाटणे, जागोजागी सभा घेणे सुरू ठेवले. या वेळी अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, दुर्वे नाना यांचा परिचय यामुळे स्वातंत्र्य यज्ञात काम करता आले.
संगमनेर हे इंग्रजांचे सर्व तर्हेचे केंद्र होते. महात्मा गांधीच्या मुळे हळु हळु वारे चांगलेच जोर धरत होते. 1930 चा लढा हा गावो गावी झाला संगमनेर याबबत आघडीवर जंगल सत्याग्रह हा कायदे भंग इंग्रजांचा एक तडाखा होता. यात वालझाडे यांचा सहभाग होता. संगमनेरच्या युवकांनी 1936 मध्ये ब्रिटिश राजवटी विरूद्ध एक कट तयार केला आणि तो राबविला सुद्धा या कटाच्या सुत्र धारांपैकी ते एक. तो आखणे व प्रत्यक्ष राबविणारे म्हणन त्यांना अटक व शिक्षा झाली. 1942 च्या लढ्ात भूमिगत राहुन इंग्रज राजवट खिळखिळी करीत होते.
1942 मध्ये महामा गांधींनी करेंगे या मरेंगेचा संदेश दिला. भारत छोडो ही गर्जना नगरच्या तेली खुंटावर दिली. तेली खुंट हा नगरच्या मध्यवर्ती परिसर. ही गर्जना नगर शहराल पसरली. अनेक स्वातंत्र्सैनिकांच्या ग्रुप्त बैठका दारूणकर यांच्या येथे होत. रोज सकाळी प्रभात व सायंकाळ सायंफेरी दारूणकर सोबत्यांना बरोबर घेऊन काढत असत. हातात तिरंगा व मुखाने नही रखनी नही रखना यह जालिम सरकार नही रखना हा आवाज उमटु लागला. इंग्रजांचे लक्ष दारूणकरांच्या कडे वळले. त्यांनी साम, दाम, दंड यांचा वापर केला. परंतु आवाज बंद होत नव्हता. उलट तिरंगा घेऊन ते इंग्रजांना सळो की पळो करीत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना आटक केली. येरवडा जेल मध्ये रवानगी केली. या ठिकाणी एस.एम.जोशी, आच्युतराव पटर्वशन या सारख्य बरोबर शिक्षा भोगताना त्यांना आनंद होत होता. सहा महिण्याची शिक्षा भोगल्या नंतर त्यांनी सावध राहुन गुप्त पणे स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.