दिनांक ०६/१२/२०१५ रोजी. सकाळी ठिक ९.०० वा. आयोजित करण्यात येत आहे.
स्थळ:- एस् एम जोशी सभागृह साने गुरुजी स्मारक राष्ट्र सेवादल , सिहंगड रोड, दांडेकर पुलाजवळ, पुणे - ३०
पुर्वी ही पालखी हिंगण गाव हुन जात असे पण ती राहुरी येथून जावू लागली. खास पालखी साठी बुर्हानगर येथिल देवीच्या भगता कडुनच पालखीचा दांडा येत असतो. ही तयार करण्याचा मान सुतारांचा आसतो. त्या साठी लागणारे खीळे लोहाराकडूनच येतात. जंगम पालखीला गोंडे लावतात हा मान त्या त्या घरातल्याना दिला जातो. तेली समाज हे सर्व करवुन घेतो. व समाज जागेत पालखी ठेवली जाते.
बुर्हानगरच्या बाळोजी भगतांच्या वंशजांनी बनवलेल्या पालखीतच देवीला स्थापन्न करतात. जानकोजी भगतांची समाधीजेथे आहे तेथे एक दिवस ठेवतात रात्री हाजारो गोंधळी, हजारो भक्त सहभागी होतात. शिंलागणास निघण्यापुर्वी पालखी मंदिराच्या होम कुंडा जवळ असते. देवीस दुधाची भोग केली जाते. देवीला पातळे नेसवली जातात नंतर जानकोजी भगत यांच वशंज स्वत:च्या कमरेस बांधुन आनलेला पेंडभाजीचा नैवद्य देवीला दाखवितात.
बुर्हानगर येथे आज ही त्यांचे वंशज आहेत आजचे वंशज श्री. अर्जुन किसन भगत यांच्याशी चर्चा करित असताना काही एैतिहासीक घटना ही सांगितल्या बाळाजी भगत यांचा पराक्रमा प्रमाणे एक कथा ही प्रचलीत आहे. जानकोजी भगत आपला तेल घाना घेत होते. त्यांना मुल बाळ होत नव्हते. देवीला नवस बोलोवा हा विचार करून त्या रात्री झोपी गेले. गाढ झोपेत असताना एक लहान बालिका दिसली. ती जानकोजीच्या जवळ आली. ते मोठ्याने झोपेत ओरडत होते, ए अबिंके ए जागे होताच स्वप्न बायकोला सांगितले
रातो रात भवानी मातेच्या मुर्ती सारखी मुर्ती शोधुन आणली. मुळ मुर्ती सिंहासनावर काढली आणि ही दुसरी मुर्ती त्या जागेवर ठेवली. रात्रीचे बारावाजून गेले होते. बाळाजीने आई जगदंबा तुमला शक्ती दे म्हणत मुर्ती उचलली. घोड्याला टांग टाकली. सोबतीचे 5/6 भगत होतेच आणि बुर्हानगरचा रस्ता धरला. इकडे बुर्हानगर जवळ करू लागले तर तुळजापूरात सुर्य उगवताच मंदिर शोधले अगदी त्वेषाने मुर्ती तोडून फोडून टाकली तो आनंदाने नाचत असतानाच त्याला कुणी तरी सांगीतले