संताजी महाराजांनी संत तुकारामांच्या गाथा लिखान केले आज तुकोबाच्या गाथा पंचक्रोशित या जागत सर्वदूर प्रचलित आहेत त्या संत संताजी जगानाडे महाराज यांच्यामुळेच. संताजी महाराज हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी जनी मनी कधिच तुकोबा ची साथ सोडली नाही .
सर्व समाज बंधवाना कळवन्यात येते की दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी संत शिरोमाणी जगनाड़े महाराज यांच्या जयंती निमित्त दि.8/12 रोजी सकाळी 10:00 वा संगत रंग महल शहागंज औरंगाबाद मधे वहान रैली काढण्यात येत आहे आयोजक - संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद तिळवण तेली समाज औरंगाबाद शहर व ग्रामीण
तेली गल्ली (गावकूसचे) सुरवातीचे दिवस होते. कुठेच धागेदोने नव्हते ते गोळा करून गुंफायचे होेते समाज संघटनाला एक दिशा द्यावयाची होती. आशा वेळी श्री. बंडोपंत गेनबा शेलार यांची ओळख झाली आणी एक भक्कम धागा सापडला आगदी पुर्वीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी सहकार्य व विश्वास दिला जीवनाची सुरवात निमशासकीय नोकरी करीत सुरू केली परस्थीतीची जान होती समाज विचाराची प्रक्रिया होती. जमेल ते करण्याची तयारी होती. यातुनच ते धडपडत होते. श्री. संताजी पालखीला आपल्या वडीलांनी पहिला मदतीचा हात दिला. एका बैलाच्या छकड्यात पालखी ठेऊन श्री. संत संताजी महाराजांना पंढरपूरात घेऊन जात होते.
स्वातंत्र सेनानी शंकरराव धावडे एक स्वातंत्र सेनानी गोवा मुक्ती अंदोलनाच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह लढणारे समाज बांधव. मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीतले म्होरके यासाठी अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. कामगार व शेत मजुर यांच्या हाक्का साठी आयुष्यभर रस्त्यावर लढत राहिले. त्यातुन अनेक प्रश्न मार्गी लागले.
औरंगाबाद शहरात तेली समाज आयोजित गुण गौरव समारंभात तेली समाजातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.