स्वातंत्र्यात सर्व समाज प्रगतीवर निघाले पण तेली समाजाचे प्रश्न त्या समाजाच्या घटकाचेच राहिले. सरकारणे बाजुला फेकलेली ही माणस. गाव गाड्यात उभे रहातात ढेपाळलेली, पेंगाळलेली, मेताकुटीस आली. पण कुठे संघर्ष केला नाही. सामुदाईक पणेएकत्र येऊन प्रस्थापीत व्यवस्था उलथुन टाकली नाही हे वास्तव सत्य जरी असेल तरी. त्यांचा फार मोठा संघर्ष नजरे आड करता येणार नाही इतकी दाहकता यात आहे. याचे जिवंत उदाहरण चास कमान धरणा जवळच्या चास गावात पहावयास मिळाले. गावात शेकडो वर्ष तेली समाज शेगा खरेदी करून गाळप करीत होता.
समाजा विषयी तळमळ, त्याग व प्रेम आपण ठेवले तर समाज ही आपल्याला साथ सोबत देतो. आपल्या कामावर निष्ठा. सर्वांची मते जाणुण सर्वांना सोईस्कर निर्णय घेणे ही त्यांच्या कामाची पद्धत अनेकांची घडन करण्यास उपयुक्त ठरली आहे. मी एक तसा तैलिक समाज महासभेचा कार्यकर्ता. संघटनेने जबाबदारी दिली म्हणुन काम करू लागलो समाजाच्या कामा निमित्त त्यांना मंत्रालयात भेटण्यास प्रसंग आले. या वेळी संघटनेचा पदाधीकारी पेक्षा माझा समाज बांधव ही त्यांनी दिलेली वागणूक विसरता येत नाही. आलेला बांधव जेवला का ? नसेल तर जेवन करावयास चला ही त्यांची आपुलकी बरेच काही सांगुन जाते. मी तुमचा आहे. तुमच्यातील एक आहे. फक्त त्या मतदार संघातील आपल्या बांधवांनी मला समाज बांधव म्हणुन भरघेस मतदान केले हणुन मी खासदार झालो. ही त्यांची नम्रता पावलो पावली दिसते. ही जाणीव आजच्या बदलत्या जमान्यात सहज सापडत नाही. याहीपुढे जाऊन त्यांनी पुढचा पल्ला गाठला. खरे तर आम्ही त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. परंतु त्यांनी महाराष्ट्र मंत्री मंडळातील उपस्थीत असलेल्या काही मंत्र्यांची आमची ओळख करून ही दिली. यतुन माझा समाज बांधव कामा निमित्त आला तर त्यांना सहकार्य करा हा ही सल्ला दिला.
मदनसिंग चावरे, जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जातीजमाती भाजपा
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भुदान यज्ञाचे प्रणेते जगविख्यात आचार्य विनोबाजी भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती डॉ. सुशील नायर आणि सहकार महर्षी स्व. दादाजी देशमुख यांच्या कर्मभुमीत देवळी येथे दि. 1 एप्रिल 1954 रोजी रामदासजी तडस यांचा जन्म झाला. वयाची 62 वर्ष पुर्ण करणार्या या पैलवानाचा आजचा उत्साह एखाद्या तरुणास लाजवेल एवढा आहे. आज रामदासजींचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना समस्त जनतेसोबत माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
वर्धा माझे माहेर पण अाता माहेर राहिलेलच नाही आम्ही दोघेच भाऊ बहिण, आई, बाबा, भाऊ, बहिणी सर्वच गेले त्यामुळे माहेरी कुणीच नाही पण माहेर या शब्दात खुप ओलावा प्रेम, सद्भाव, शक्ती सार काही समावलेल आणि हे माहेरपण अनुभवायला मिळालं रामदासजी तडस यांच्याकडे.
अनेक समस्यांनी ग्रस्त असलेलेव हजारो कोटींच्या कर्जाचा बोजा असलेले ऊर्जाखाते बावनकुळे यांनी अतिशय खंबीरपणे गेल्या दीड वर्षात प्रगतीपथावर नेऊन राज्यातील शेतकर्यांना, सामान्य ग्राहकांना व उद्ोजकांना चांगल्या स्वरूपात लाभ करून दिला आहे. मंत्री बावनकुळे यांनी सर्वसामान्यांची कामे तळमळीने व प्रमाणिकपणे तडीस नेली आहेत, त्यामुळेचतेली समाजाला बावनकुळे यांच्याबद्दल आदर आहे. घराच्या लोकांचा पाठींबा व कौतुकांची थाप पाठीवर असावी, जेणेकरून तेली समाजातील हे नेतृत्व आसेच दिवसेंदिवस राज्य व देश पातळीवर प्रगती पथावर रहावे ही सदिच्छा व्यक्त करून जिल्ह्यातील समस्त तेली समजातर्फे त्यांना कर्तृत्वाचे सन्मानपत्र देण्यात आले.