घरात बाजरीची भाकरी व खर्डा मी जेवलो तसा आज ही या सुखी कुटूंबाचा नेहमी अग्रह मोडता येत नाही. श्री. दत्तोबा यांनी ओळख पाळख नसताना एक समाज बांधव ही साथ दिली. आज ही ते दरवर्षी सुदूंबरे येथे येत असतात. त्या अफाट समाजात त्यांना संताजी भेटतात. तेली समाजाच्या संघटनेत सहभागी होतात. माझा समाजही जाणीव त्यांच्या अंतकरणात कायमची कोरली आहे. समाजातील सर्वात जर हे कोरीव काम झाले तर प्रगती लगेच होईल.
श्री. भागवत कचरूशेठ लुटे, मु. साकुरी, ता. रहाता, जि. अ. नगर, यांचा रविवार दि. 28/6/2016 रोजी वाढदिवस समारंभ संपन्न झाला. श्री. लुटे यांनी विविध पदांवर आजवर कार्य केले आहे. त्याचा अत्पसा परिचय.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 2)
स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात देशात विखुरलेल्या तेली समाजातील अनेक पोट शाखा एकत्र आल्या त्यांनी तैलिक संघटना स्थापन केली. उद्देश काय तर समाजाचे सामाजीक संघटन व्हावे सामाजीक सांस्कृतीक प्रश्न मिटावेत. या साठी दिल्ली येथे मुहर्तमेड रोवली.. त्या काळात दिग्रज येथिल कै. माधवराव पाटील आमदार होते. त्यांनी देशपातळीवरील पदाधीकार्यांना बोलावून महाराष्ट्रभर परिषद्या लावल्या दुर्देव आसे विदर्भ वगळता याला जनाधार मिळाला नाही. पण जेंव्हा समाजमाता कै. केशारकाकु यात सामिल झाल्या तेंव्हा बर्याच बांधवांना त्यांनी याची गरज पटवुन दिली. मा. खा. शांताराम पोटदुखे यांची साथ ही मिळाली. आणी तैलीक महासभेचा पाया त्यांनी इथे निर्माण केला. त्या वेळी त्या खासदार होत्या. आशा वेळी अहमदनगर येथील सभेत त्यावळचे आमदार श्री. रामदास तडस हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. तरूण नेतृत्व त्यात खेळाडु. संघटन कसे बांधावे याची प्रत्यक्ष अनुभवातुन जाणिव. हेवे दावे आपण मिटवायला आहो ही जिद्द. समाज जागा झाला पाहिजे ही धडपड. आपल्या साध्या शब्दाने ही समाज विस्कटु शकतो. ही नजर. या नजरेत आम्ही कुठे चुकलो किंवा समाजातील सामान्य बांधवांने जी चुक समोर आणली तर ती प्रांजळ पणे मान्य करून सुधारणे ही पैलवानी प्रकृती.
तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न
दिंनाक 8-5-2016 या दिवशी तळेबाजार येथे माधवबाग कणकवली, सिंधुदुर्ग यांचे मार्फत डॉ. पल्लवी पाटील यांच्या सहकार्याने तमाम तेली बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाले. समस्त समाज बांधवांनी याचा लाभ घेतला.
संताजी सेना अकोला महानगर द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सन-2016 तेली समाजाचे नाव जगासमोर चमकवनारे उद्याचे तारे………
इयत्ता 10 वी आणि 12 वी उर्तीण विद्यार्थी अनुक्रमे 60 टक्के व त्याहुन अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांनी आपली आँनलाईन गुणपञीकेची प्रत जमा करावी हि विनंती………!! तसेच आपल्या परिसरातील समाजबांधव नातलग मिञ परिवार यांना देखिल कृपया या समारंभा संर्दभात माहिती द्यावी…… आपला सत्कार घेणे हे आमचे सौभाग्य आहे…
कार्यक्रम:: रविवार दि 12/06/2016 वेळ::= दुपारी 4 वाजता स्थळ:: नविन राठोड पंच बंगला, शिवाजी नगर, जुने शहर, अकोला… प्रेषक श्री संताजी सेना अकोला जिल्हा