लक्ष्मण महाराज हे तसे मुळचे रहीवासी नागडे गांव ता. येवला येथील होते. परंतु पुढे व्यवसायाचे निमित्ताने शिर्डीला स्थाईक झाले. त्याकाळी मोठे होलसेल किराणा दुकान होते. परंतु त्यांच्या व आमच्या अशा दोन्हीही कुटुंबामध्ये मागील काही पिढ्यांपासुन भगवद्भक्तीचा वारसा चालत आलेला आहे. माझे आजोबा ह.भ.प.श्री.चंद्रभानजी लुटे हे आळंदीला जोग महाराजांनी सुरू केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी होते. त्यांनीच लक्ष्मण महाराजांना आळंदीला जाण्याची प्रेरणा दिली व आळंदीला वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी ठेवले. आमच्या कुटुंबाचा पहिल्यापासुनच बेटावरील सर्व महात्मांशी सतत संपर्क राहीला.
संत शिरोमणीतुकाराम महााजांच्या अगोदर पासून चालु असलेली पंढरपूरी वारी सर्व भगवतभक्त वारकर्यांना दरवर्षी या आनंद सागरात यथेच्छ आनंदाने भक्ती रसात डुंबायला मिळते. वारीसाठी तो वयाचा विचार न करता त्यात तन मन धन अर्पुण सामिल होतो. चातका प्रमाण तिची वाट पहातो. त्या वारीचा आनंद काही वेगळाच असतो.
हेचि व्हावी माझी आसा ॥
वारी चुको नेदी हरी ॥
संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर जाणार्या आमच्या समाज बांधवांना श्री संत संताजी महााजांचीही पालखी सोहळा असावा अशी मनाेेमन तळमळ होती. कै. धोंडीबा राऊत, कै. रत्नाकर दादा भगत, कै. शरद देशमाने, कै. रावसाहेब पन्हाळे व कै. अर्जुनशेठ बरडकर यांच्य निश्चयातुन 1978 साली सोहळा सुरू झााला. पुणे परिसरातील अनेक महाराजांवर श्रद्धा असणार्य भक्त मंडळींनी आप आपल्या परीने पालखी सोहळा वृध्दींगत होण्यासाठी हातभार लावलेला आहे.
शिर्डी :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राहाता तालुका अध्यक्ष पदाची निवड शिर्डी येथे गणेश मंदिरात झाली. यावेळी निवडणुक निरिक्षक म्हणुन प्रांतिक उपाध्यक्ष श्री.करनकाळ, श्री. सुधाकर कवडे उपस्थित होती. या वेळी सर्वश्री भागवत लुटे अध्यक्ष उत्तर नगर जिल्हा, श्री. सोमनथ बनसोडे कार्याध्यक्ष उत्तर नगर जिल्हा, श्री. दत्तात्रय सोनवणे अध्यक्ष राहुरी तालुका, श्री. सदाशीव पवार, श्री. सुधाकर कवडे, जि. नाशिक असे किमान दोनशे समाज बांधव उपस्थीत होते. प्रत्येकाने सामाजीक प्रश्ना बाबत, पदाधीकारी कामकाजा बाबत विचार मांडले अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात निवडणुक प्रक्रिया संपन्न झाली
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 4)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक बैठक सोडुन ही संघटना राजकारणाकडे वळली. काळानुरूप बदल झाला ती सुद्धा गरज समजु. काही वर्ष सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारंची मंडळी यात हेती. पक्षीय विचारा पेक्षा समाज विचार मोठा होता. पण आज काय झाले आहे. जो पक्ष सत्तेवर आहे त्यांच्याकडे आपले तोंड आहे. ते ही असावे परंतु आपण समाजसाठी काही मागीतले नुसत्या मागण्या करून देण्यासाठी ते खुर्चीत बसले नाहीत या साठी सत्तेतील व विरोधातील मंडळींचा एक दबाव गट करून पदरात काही मिळवले पाहिजे. ही वाटचाल संघटने द्वारे केली का ? यावर चिंतन झाले का ?
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 3)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नंदूरबारच्या मिटींगमध्ये महाराष्ट्र तैलिक महासभा काँग्रेसच्या दावणीतुन भाजपाच्या पायावर ठेवली हे मी स्पष्ट मांडले आहे. महाराष्ट्रात तेली समाजाची 10 ते 12 टक्के मते आहेत. त्यात विदर्भात हे मतदान 25 ते 40 टक्के मतदार संघातुन आहे. भाजपाने विदर्भात जी आघाडी घेतली त्याला. तेली मतदार महत्वाचा आहे. एक खासदार व 4 आमदार त्या परिसरातुन निवडले गेले. भाजापाच्या पायावर समाज ठेवण्यापुर्वी दबाव गट ठेवला आसता तर संख्या बळ वाढले आसते. लोकसंख्येने अल्प असलेल्या ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साडेतीन टक्के आहे. त्यांचे 13 आमदार व आज 10 मंत्री आहेत.