Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

अहमदनगर तेली समाजाचे श्री बद्रिनाथ पंढरीनाथ लोखंडे

     समाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजाचे काम करण्याची संधी मिळाली व शिर्डीत मोठा तेली समाज असल्यामुळे सांघीक वातावरण तयार झाले. पुढे तालुका संघटनाचे काम चालु झाले त्यात मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ती मी जबाबदारीने पुर्ण करत आहे. आज नगर जिल्ह्यात राहाता तालुक्याचे काम मोठ्या आघडीवर आहे. संताजी महाराजांची दिनदर्शिका आम्ही चार वर्षापासुन करत आहोत. प्रतिमा पुजन, नविन उपक्रम चालु केला त्यात सुद्धा यश मिळाले

दिनांक 11-06-2016 12:28:27 Read more

तेली समाजाचे श्री. रमेश सदाशिव भोज

      श्री संताजी प्रतिष्ठाण कोथरूड येथे संघटक म्हणुन काम पहात असुन नुकताच एक वधु वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष म्हणुन जबबदरी पार पाडली. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील कनाकोपर्‍यातील समाज बांधव हजर होते. या मेळाव्याचे वैशिष्ट्ये म्हणजे मोफत प्रवेश होता.

    हे सर्व सामाजिक काम आपली नोकरी सांभाळुन घर संभाळुन कामाचे खाडे न होता आणि विशेष करुन त्यांच्या पत्नीच्या सहकार्याने सौ सुनिता भोज यांच्या मदतीनेच ते करू शकले असे ते अभिमानाने सांगतात अता गरज आहे तुमच्या आशिर्वादाची सहकार्याची आणि प्रेमाची.

दिनांक 11-06-2016 12:20:00 Read more

कै. त्रंबक रघुनाथ दारूणकर अहमदनगर तेली समाजाचे घडनकर्ते

शाब्दांकन : सौ. रूपाली राजेश काळे

    तात्यांना सुरूवातीपासुन समाजकार्य व राजकारण यांची आवड असल्यामुळे ते सतत समाजकार्यात सहभागी होत. पुढे टी.आर. दारूणकर अहमदनगरचे नगरसेवक झाले. तसेच त्यांनी 1 डिसेंबर 1962 ते 16 डिसंबर 1963 व 21 डिसेंबर 1964 ते 30 जुलै 1965 असे दोन वेळा महाराष्ट्रातुन प्रथमच पहिले तेली समाजाचे नगराध्यक्ष म्हणुन काम पाहीले. त्याचबरोबर जिल्हा क्राँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी ग्राहक भांडारचे चेअरमन व एस.टी.बोर्ड मेंबर वगैरे अनेक पद भुषविले त्याचप्रमाणे अखिल भारतीय शाहू तेली समाज दिल्ली या संस्थेत सदस्य म्हणुन ही त्यांनी काम केले. खरंच जीवनात प्रत्येकजन समाजाचे म्हणुन काही देणे लागतो. म्हणुन काही कार्य करतो. पण तात्यांना समाजाविषयी जाणिवच नाही तर तळमळ होती म्हणुन त्यांनी कित्येकांना रोजगार मिळवुन दिले. जमेल त्याप्रकारे ते सर्व समाजबांधवांची तसेच समाजील गरजुंची मदत करायचे तिळवण तेली समाजाच्या अध्यक्ष पदावर त्यांनी सतत 25 वर्षे कार्य केले.

दिनांक 11-06-2016 02:34:08 Read more

कोल्हारच्या क्षिरसागरांची बाजरीची भाकरी व खर्डा

    घरात बाजरीची भाकरी व खर्डा मी जेवलो तसा आज ही या सुखी कुटूंबाचा नेहमी अग्रह मोडता येत नाही. श्री. दत्तोबा यांनी ओळख पाळख नसताना एक समाज बांधव ही साथ दिली. आज ही ते दरवर्षी सुदूंबरे येथे येत असतात. त्या अफाट समाजात त्यांना संताजी भेटतात. तेली समाजाच्या संघटनेत सहभागी होतात. माझा समाजही जाणीव त्यांच्या अंतकरणात कायमची कोरली आहे. समाजातील सर्वात जर हे कोरीव काम झाले तर प्रगती लगेच होईल. 

दिनांक 11-06-2016 00:38:07 Read more

श्री. भागवत लुटे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

     श्री. भागवत कचरूशेठ लुटे, मु. साकुरी, ता. रहाता, जि. अ. नगर,  यांचा रविवार दि.  28/6/2016 रोजी वाढदिवस समारंभ संपन्न झाला. श्री. लुटे यांनी विविध पदांवर आजवर कार्य केले आहे. त्याचा अत्पसा परिचय.

दिनांक 11-06-2016 00:30:04 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in