Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज "राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा" नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात संपन्न झाला. अखिल भारतीय तैलिक साहू समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले. या परिचय मेळाव्याकरिता आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.डी.पी सावंत, महापैर शैलजाताई स्वामी, मनोहर शिंगारे (उद्योगपती जालना), संपादक जि.एम जाधव, ज्येष्ठ पत्रकार भगवान बागूल, उद्योजक प्रेमनाथ परळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.
भावपुर्ण श्रद्धांजली गं. भा. जमुना दगडू राऊत
गं.भा. जमुना दगडू राऊत यांचा मंगळवार 2/4/2017 रोजी स्वर्गवास झाला.
श्री. रमेश राऊत माजी पंच तेली समाज पुणे व बिबवेवाडी येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्या त्या मातोश्री होत.
माता कर्मा की जयंती के शुभ अवसर पर साहू समाज वर्धा द्वारा दिनांक २६/०३/२०१७ को कार्यक्रमों का सफल आयोजन किया गया मुख्य अतिथि श्री रामनारायण साहू पूर्व सांसद व् उद्धघाटन श्री रामदास तड्स जी ने किया। श्री उमेशनंदलालजी साहू, श्री रामाशंकरजी साहू, श्री यस राहुलजी , श्री शुभमजी ढोले, श्री सुनीलजी साहू, श्री अतुलजी वंदिले आदि प्रमुख अतिथि थे।