येथील कुमठे फाट्यावर असलेल्या साई मंगल कार्यालयामध्ये उद्योगपती, जायगावचे सुपुत्र पोपटराव गवळी यांचा तेली समाज व ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्पहार सन्मानपत्र दऊन पफथवीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, दादाराजे खर्डेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बाचल, माजी जि. प. सदस्य किरण बर्गे, मनोहर बर्गे, सरपंच जयश्री सपकाळ, सुभाष उर्फ नाथा कदम उपस्थित होते.
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गेली दोन वर्षा पासुन रस्त्यावर नसलेले अंदोलन कुठे तरी धुमसत होते. तेवढ्यात महाराष्ट्र शासनाने पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर केला. तो होताच त्याला प्रचंड असा विरोध सुरू झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधाच्या नाकावर टिचुन महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार जाहीर केला. इथेच विस्तवाला फुंकर मारली. पुरोगामी विचाराचे चळवळ वाले काही संघटना दाबलया गेल्यात त्यांचा आवाज दडपला गेला हा मुक्त संदेश होता. पण पुरंदरे विषयी एवढा राग का याचे उत्तर मी शोधत होतो त्याच दरम्यान प्रा. अ.ह. साळुंखे यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी अभ्यास करून ज्या बाबी पुराव्यानीशी मांडल्या. पुरंदरे यांनी शिवचरित्र्यात संधी मिळेल तेथे मराठा समाजाची अब्रू वेशीवर कशी टांगली. पुरंदरे आपल्या शब्द सामर्थावर पराक्रम मांडताना मराठ्यांना हिन कसे बनवतात हे पुराव्या निशी त्यांनी मांडले. याच वेळी ब्रामहणांचा उद्धात्तीकरण करिताना त्यांनी केलेली धडपड स्पष्ट पणे समोर येते. आशा पुरंदरेंना पुरस्कार ही चिड त्या समाजा समोर येते. परंतु तेली, माळी, नाभीक, महार, लोहार, चांभार, अशा जातीतील मंडळींचा इतिहासच पुसन टाकुन आपल्याला शिवाजीच्या पराक्रमी इतिहासातुन नामशेष केले. याचे साधे सोयर सुतक ही वाटले नाही. आपण कुणाच्या तरी कळपाचे चाकर झालो. ही वास्तवता विसरता येत नाही. म्हणुन ही मांडणी करतो.
शिंगणापुर तिळवणतेली समाज व संताजी तरूण मंडळ व समस्त ग्रामस्थ राजुर यांच्या पाच दिवसांच्या राजूहुन शनि शिंगणापूरला निघालेल्या पायी तेल कावड दिंडी प्रवासाच्या दिंडींचे स्वागत सोनई येथे भव्य मिरवणुकीन स्वागत करण्यात आले. तेल कापड पायी यात्रा ही अखंडपणे चालु राहुन तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रोत्साहन द्यावे व सहभाग घेण्याचे आवाहन शनि-शिंगनापुरचे पो.नि. कैलास देशमाने यांनी केले व पुढील शनी-शिंगणापुर ते राजुर प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग ( भाग 4 )
माझ्या उमेदीच्या काळात बाळासाहेब पुरंदरे शिवचरित्र एकदा नव्हे तर 3/4 वेळा वाचले. किती स्फुर्ती मिळत होती ती अनुभवली. जेष्ठ चित्रकार दिनानाथ दलाल यांची चित्रे माझा जीव की प्राण होते. गणपती मंडळांना तर मी या रेखा चित्रावरून अनेक देखावे बनवुण दिले. पण जेंव्हा श्री संत संताजी व तेली समाज हा विषय गेली 30 वर्ष पाहू लागलो तेंव्हा कळू लागले. आरे ही तर एक बखर यात नुसता ब्राह्मण गौरव जाता जाता मराठा पराक्रम. पण यात तेली, माळी, सुतार, नाभीक, लोहार, मातंग, महार या जाती मधील बांधवांनी जो पराक्रम केला त्याची जाणीव सर्व पुस्तकात एक अक्षराने नाही. कारण आसे ही असावे बखर कार या समाजाचे नसावेत. दुसरे कारण असे असावे मुद्रण कला अस्तवात आल्यावर इतिहास संशोधन करण्यासाठी अनेकांनी विश्वासाने कागद पत्रे दिली ती लगेच नष्ट झाली का तर इतिहास हा त्यांना सोईचा लिहायचा हेाता. यातुन संत तुकाराम सुटले नाहीत तर इतरांची काय अवस्था असेल हे स्पष्ट होते. तरी सुद्धा आज जे त्यांच्या अतीरेकी कार्यवाहीतून जे शिल्लक आहे त्यावर संशोधन करणे तेवढेच गरजेचे आहे.
इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग ( भाग 3 )
हा पलंग जो आहे त्याचा इतिहास सुद्धा पुसट ठेवला आहे. आणी आम्ही नगर सबजेल चौकातील नगर पलंगे बांधव घेऊन जातत एवढेच समजतो. तो घोडेगाव येथे बनविला जात तोे येथे लाकडाचे कारीव काम करणार्या समाजाकडे असे त्यांना ठाकूर किंवा तुलवे म्हणत त्यांना त्याबद्दल दोन घरे वतन म्हणुन आहेत. ही घराणी कालांतराने पुणे येथे स्थालांरीत झाली. घोडेगाव, ता. अंबेगाव, जि. पुणे येथिल तेली समाज बांधव हा पलंग बनवुन घेतात बनवलेला पलंग हा तेली समाज संस्थेत ठेवतात येथे भावीक दर्शन घेतात. घोडेगाव येथिल जेष्ठ व जाणकार बांधव यांच्याकडे चौकशी केली असता समजले