सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.
आता पालखीला भक्कम पाया लाभला होता. चालणार्या वारकर्यांच्या पायाखाली जी वाळू होती ती संपली. आता ती सरकण्याचा प्रश्नच नव्हता सर्वानी जुने वयोवृद्ध व्यवहारे मामांना जवळ घेतले. पालखीचा मोठा ध्वज त्यांच्याजवळ दिला. त्यांना झेंडेकर्याचा मान दिला सर्व बांधवांनी दर्शन घेतल्यानंतर पुणे सोडले तरी अनेक बांधव पालखीबरोबर वडकी नाल्यापर्यंत सोबतीला आले.
मार्गदर्शन मिळाले माहिती मिळाली आता यापुढे काय ? हा प्रश्न उत्तर न देता रोज सतावत होता. अशीच एक वेळ सुदुंबरे येथे कार्यकारिणीचा उत्सव कसा साजरा करावा या विषयी नेहमीप्रमाणे मीटिंग होती. ही बातमी समजताच राऊत इंदोरीहून सुदुंबर्यास गेले. मागील अनुभव जमेस असल्याने त्यांनी पालखीचा विषय या मिटींगमध्ये उपस्थित काही केला नाही
मीटिंगच्या ठरलेंल्या विषयावर चर्चा वगैरे होऊन मीटिंग संपणार तोच राऊत उभे राहिले. आपली आहे ती ओळख सांगितली. संताजी महाराज यांची पालखी आपल्या संस्थेद्वारे पंढरपूर येथे जावी. याबाबत कार्यकारिणीने विचार करावा. मग यावर चर्चा सुरू झाली. वारकर्यांची मते होती तशीच कार्यकारीणीची मते होती. सर्वांनी बहुमताने त्यानी मांडलेला ठराव फेटाळला. राऊतांना दु:ख झाले. ही आपली मंडळी, पण हीसुद्धा साथ देण्यास असमर्थ आहेत.
एकनाथाच्या हाती ज्ञानेश्वरी पडण्यापुर्वी तो भागवताच्या एकादशस्कंदावर स्वत: लिहिलेल्या टीकेचे व भावार्थरामायणाचे पुराण सांगत असे. त्याच्या पुराणास येणार्या मंडळीत एक तेली होता. त्याने एक दिवशी ज्ञानेश्वरीची जुनी पोथी एकनाथाकडे आणली आणि म्हणाला. ’महाराज, ही एक पोथी माझ्या घरात फार दिवस पडली आहे, हिचा आपल्यास काही उपयोग झाल्यास पहा. ब्रह्मज्ञानाने ओतप्रोत भरलेला तो ग्रंथ पाहून एकनाथास फारच आनंद झाला. पुसत आलेल्या त्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करण्याच्या हेतूने एकनाथाने त्याची एक नवीन प्रत तयार केली. पण या नव्या प्रतीतत्याने मनास वाटेल तसा फेरफार केला ! नंतर लवकरच त्याने स्वरचित ग्रंथास फाटा देऊन, ज्ञानेश्वरीचेच पुरण सांगण्यास प्रारंभ केला.