पुणे :- श्री. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या मार्गदर्शनातुन ओबीसी समाजाचा इतिहास, शासकीय आदेश, समस्या यांचा वेध घेणारी www.ObcSevaSangh.com वेबसाईट सुरू करण्यात आली सदर वेबसाईटचे उद्घाटन माजी नायब तहसिलदार श्री. बाळासोा अंबिके, उपाध्यक्ष ओबीसी महासभा महाराष्ट्र यांच्या हास्ते झाले.
साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच "डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली .
पुणे :- सन २००३ चा तेली समाजाचा महामेळावा यशस्वी करणारे जे जे होते त्यातील श्री. रामदास धोत्रे हे प्रमुख होते. महाराष्ट्र तेली महासभा पश्चिम महाराष्ट्रात ते रूजवणारे पहिले होत. त्यांनी ही संस्था सक्रिय होण्यात तन मन व धन खर्ची केले.
तेली समाजाचे खास पदार्थ
कारळी चटणी
काळे तीळ बैलाने फिरवलेल्या घाणीत घालून चांगला भुगा करून घ्याव अथवा भुुगा करून घ्यावा. त्यात काळ्या तिळाचेच तेल व तिखट व मिठ घालावे. पापड भाजुन घ्यावेत व त्याचा चुरा करून तो त्यात् टाकवा. अशा रितीनेकारळी चटणी तयार होईल ही चटणी आरोग्यास अंत्यंत पोष्टीक आसते.
जय संताजी युवा मंचातर्फे सिडकोतील राजीव गांधीनगरातील महालक्ष्मी चौकात वृक्षारोपण करण्यात आले. वनसंवर्धनाविषयी सोमनाथ सुरडकर यानी महिती दिली. या वेळी राधाकिसन सिदलंबे, दत्ता भोलाने, रवी लुटे, शिवा काळेख सदाशिव ठकारे, सुधीर सुरडकर, सचिन कहाळकर, वसंत बोराडे, सुनील तवले, दीपक आहिरे, अमोल राठोड, महेश केदारे, रवी गायकवाड, अशोक भालकर यांची उपस्थिती होती.