समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ व्या जयंती दिनानिमित्त विदर्भात ८ डिसेंबरला ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. देऊळगाव राजा न. प. वाचनालयात सर्वप्रथम श्री संत संताजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे यांनी जगनाडे महाराजांच्या जिवन चारीत्रावर प्रकाश टाकला.
देऊळगावराजा - तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी तर म्हटले आहे, संताजी तेली बह प्रेमळ अभंग लिहीत बसे जवळ धन्य त्याचे सबळ संग सर्वकाळ तुक्याचा आणि भक्ती लीलामृत या ग्रंथात, संताजी तेली वैष्णववीर तसेच तुकारामांची गाथा संताजीच्या अथक परिश्रमांमुळेच जिवंत राहू शकली, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती निमित्त छोटे खानी कार्यक्रमत केले.
दि. 8 डिसेंबर रोजी सर्वप्रथम सवणा ग्रामपंचायत व डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व जि. प. मराठी शाळा येथे संपन्न झाली व त्या नंतर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली या मध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्रीकृष्ण सेठ करवंदे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सखाराम दादा करवंदे, विश्वभंर करवंदे बबनराव करवंदे अनिलसेठ करवंदे होते
श्री संताजी महाराज सेवाभावी संस्था देऊळगावराजा अंतर्गत, तेली समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा बुलढाणा, श्री संत नगरी शेगांव, जि. बुलढाणा,
रविवार, दिनांक : १६ जानेवारी २०२२ • वेळ : सकाळी १० ते ४ • मेळाव्याचे ठिकाण : पांडूरंग कृपा, कुणबी समाज भवन, शेगांव
श्री संताजी स्नेही सेवा समिता, ता.पवनी जिल्हा .भंडारा व्दारा आयोजीत संताजी महाराज जयंती, तेली समाज उपवर वधु-वर परिचय संम्मेलन दि. १२ डिसेंबर २०२१ सकाळी १२.०० पासुन स्थळ : गांधी भवन, जुना बस स्टॉप,पवनी ता.पवनी, जि.भंडारा