Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संत संताजी महाराज सभागृह खामगांव भव्य सभागृह लोकार्पण सोहळा निमंत्रण खामगांव शहरात श्री संत संताजी महाराज सभागृह किंमत ७२ लक्ष रु. खर्च करुन बांधण्यात आलेल्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. दिनांक: 11 डिसेंबर 2022 वेळ : संध्या ६:०० वा. स्थळ : सिव्हील लाईन, भिसे प्लॉट, खामगांव, जि. बुलडाणा
लोहारा : जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग, इंद्रायणी नदीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते. दोघांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे संत तुकारामांचा पट्टशिष्य, महाराष्ट्रातील तेली समाज घडविणारे
संताजी महाराज जयंती सोहळा बुलढाणा २०२२ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.०८ डिसेंबर २०२२ रोजी ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम शाळेशेजारी खळेगाव ता.लोणार जि. बुलढाणा या स्थळी करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाची वेळ दुपारी १-३ वाजता महाप्रसाद ३ ते ६
धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या खान्देश तेली समाज मंडळाची साक्री तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी कार्यकारणी जाहीर केली. तालुका अध्यक्षपदी श्री युवराज पंढरीनाथ महाले, साक्री, उपाध्यक्ष श्री पराग परशुराम चौधरी, साक्री,
दहावी - बारावीमध्ये नेत्रदीपक यश मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बुलढाणा खामगाव - येथून जवळच असलेल्या वाडी येथील सौभाग्य लॉनमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष राजेश झापर्डे, सचिव गणेश खेडकर, खामगाव तालुका तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ. नंदाताई सोनटक्के, सचिव अर्चनाताई जामोदे, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्ष