आठवडे बाजाराचे रूपांतर केले दिवटेंनी मॉल संस्कृतीत
पिड्यान पिड्या जोपासलेला तेल घाना घानवडीतुन उपसुन बाहेर ठेवण्याची वेळ आली तेव्हां समाजबांधवांनी पर्याय शोधले. यातील एक पर्याय म्हणजे भुसार मालाची ठोक खरेदी विक्री, गावात शहरात किराणा दुकान, अल्प भांडवलावर परिसरातील आठवडे बाजारात पाल ठोकुण किराणा माल विक्री. या आठवडे बाजारातुन अनेकांनी नंतर झेप जरूर घेतली आहे. परंतु आठवडे बाजार करता करता मॉल संस्कृतीला आपले करून त्या व्यवसायात मांड ठेवून वावरणारे कोणच मला भेटले नाही. हि सत्य बाब जवळ असताना या माझ्या सत्याला मान्य करता येणार नाही अशी वाटचाल संगमनेर येथील दिवटे परिवाराने करून दिली. त्यांच्या या वाटचालीचा मागोवा.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 4)
फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात एका बांधवांची भेट झाली आगदी त्यांनी दमबाज भाषेत सांगितले. बरे लिहा टिका लिहु नका. जर आसे घडलेच तर ते कुठे अडकवतील व कुठे संपवतील हे सांगता येणार नाही. दहशदवाद जो म्हणतो, दादागीरी जी म्हणतो ती हिच. तेली गल्ली मासिकाच्या सप्टेंबर 2013 च्या अंकात मी मांडले होते. (पवार व चव्हाण या नेत्याबाबत) असल्या दादागीरीचा पुरता तळपाट होतो. मराठा समाजाच्या दादागीरीचा शेवट काय झाला हे आपण पाहिलेत. मग समाज घडवायला निघलोत जाहिर सभेतगर्जना आपण करतो. तेली हा एक आहे हे पटवतो. काळानरुप वागा भेद गाडा म्हणातो पण प्रत्यक्ष काय ? कोयना नगर येथे जो तिळवणचे बोळवण करा सांगितले. पनवेल येथे कुत्र्याची उपमा दिली गेली. कल्याण येथे किडा मुंग्यांची उपमा दिली. ही व्यक्तव्य करणार्या पदाधीकारी बांधवांची भुमीका रास्त आहे ?
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 3)
मी सुरूवातीलाच मांडले मत असावीत या मतातुन संघटना उभी रहाते. सन 2010 पुर्वी जे मोजके शिलेदार खा. तडस साहेबाकडे होते त्यांना केशरकाकुंचे मार्गदर्शन होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव होता तडस साहेबांची संघटन प्रणाली होती. पुण्या सारख्या परिसरात शेकडो जन यात झोकुन देऊन उभे होते. त्यांचे नेतृत्व आकाराला येऊ लागले होते. पण पुढील वाटचालीत यातील बरीच वयोवृद्ध झाले काहींना निर्णय प्रक्रिये पासुन दुर ठेवले. काहींना घरचा रस्ता दाखवला गेला. याच ठिकाणी नाराजीची लागन मुळ धरू लागली.
जय संताजी प्रतिष्ठाण बिड, आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारोह
शुभहस्ते :- मा. आ. श्री. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष - अखिल भारतीय तैलीक महासभा तथा उपगट नेते राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा.
प्रमुख उपस्थिती
मा. श्री. रविंद्रजी (दादा) क्षीरसागर, चेअरमन - गजानन सह. सा. का. राजुरी न.
मा. श्री. डॉ. योगेशजी क्षीरसागर, युवा नेते
मा. श्री. हेमंतजी क्षीरसागर, युवा नेते
मा. श्री. अर्जुनजी क्षीरसागर, युवा नेते
सौ. कविता यशवंत भागवत ग्रा. पं. सदस्या.
बदतापुर - अकोले तालुक्यातील बेलापुर (बादगी) या येथिल ग्रामपंचायत सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे. बेलापुर समाजबांधवा तर्फे त्यांचे अभिनंदन.