महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात तेली आणि इतर समाजात भरपुर जणान कडे पाटीलकी आहे. या पदाचा आणि जातीचा काही ही संबंध नाही.
बऱ्याच जणांना 'पाटील' या अधिकारपदाची सुरुवात शिवरायांनी केली, असे वाटते. सत्य इतिहास असा नसून 'पाटील' हे पद शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अस्तित्वात होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते. मुळात 'पाटील' या पदाचा उगम सातवाहन काळात झालेला दिसतो. सातवाहनांच्या काळात सातवाहन राजांनी महसूल वसुलीसाठी 'पट्टखील' हे पद निर्माण केले होते.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 5) - मोहन देशमाने
डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी घटना लिहीली नसती किंवा ती क्षत्रिय किंवा ब्राह्मण समाजात जन्म घेतलेल्याने लिहिली असती तर समता हा संविधानाचा गाभा राहिला नसता हे वास्तव आपण जेंव्हा सात काळजाच्या कप्यात कोरत नाही. तो पर्यंत असेच घडणार काँग्रेस संस्कृती व भाजपा संस्कृती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात ओबीसी संस्कृतीचे मालक कोण ही खरी भांडणे आहेत. हे आसे नसते तर घटनेत जे दिले होते ते ओबीसींचे आहे. सांगावयास सन 1978 साल का यावे लागले. 45 टक्के हिंदू आहेत. या आपल्या हिंदू बांधवांचा विकास करणारा मंडल आयोगाला मान्यता सोडाच त्याला विरोध करणारी संघ संस्कृती आज पर्यंत जी यंत्रणा राबवत आहे ती 45 टक्के ओबीसींच्या कल्याणाची आहे का ?
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 4) - मोहन देशमाने
तेली गल्ली मासिक व या मासिकाच्या विचार धारेला बंद पाडा. याचे प्रयोग समाज पातळीवर अनेकांनी करून पाहिले. अगदी जहिराती देऊ नका वर्गणीदार होऊ नका. आसाही प्रचार केला तो खाजगीत व जाहिर सभेत ही झाला. तरी सुद्धा समाजाने आमची भुमीका अभिमाने स्विकारली. हे जेवढे सत्य आहे. तेवढे हे ही एक सत्य आहे की आमची समाजाच्या हित व अहित बाबत खंबीर भुमीके मुळे समाजाचे नेतृत्व सावध होत आहे. सुर्य उगवला पाहिजे तो कोणाच्या डालग्यातील कोंबड्याने बांग दिली ही गोष्टच गौण आहे. काँग्रेसने फसवले भाजपाने ओरबडले ही बाब समाजाला सांगण्याची माणसीकता निर्माण होत आहे.
श्री संताजी जगनाड़े महाराज हे,
संत तुकाराम महाराज यांचे शिष्य होते
असा भ्रामक व खोटा प्रचार ब्राह्मणवाद्यान कडून केला जातो
कोणीही वारकरी संत स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्याला आपल्या पेक्षा छोटा समजत नसे
वस्तुतः सर्वच संत हे एकमेकांना
भाऊ - गुरुभाई मानत असे