भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
रमेश आंबेकर :- हे मिलकमगार होते. मिल बंद झाल्यावर अमरावतीला स्थिरावले सामाजिक ऋण हे मासिक अनेक वर्ष प्रकाशित करन समाजप्रबोधन केले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
अरूण वंजारकरांचे कौतुक करावे तेवढे कमीच आपल्या पेन्शनच्या रकमेतुन केवळ समाजसेवेची आवड म्हणून अखंड मासिक प्रकाशित करणार्या वंजारकरांना म्हणूनच मानाचा मुजरा तेली समाजाचे लेखक कविंना व्यासपिठ मिळावे संताजी समता परिषद संस्थेमार्फतही प्रबोधन ते करतात
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
गणेश पवारांचा रोखठोक मराठवाडा :- गणेश पवार नावाचा युवक औरंगाबादचा राहणारा ! तेली समाजासाठी पदरमोड करून सतत उपक्रम राबविणारा तरुण समाजप्रेमाने झापटलेला या युवकाने रोखठोक मराठवाडा काढून समाजजागृतीचा नवा आयाम निर्माण केला. स्वत:ची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना बाळ हनुमानाने सुर्यालाच धरण्यासारखा प्रकार पण हे आपार साहस गणेश पवारच करतो
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
विजय बाभुळकर :- हे विदर्भ तैलिक महासंघासाठी व्यवस्था परिवर्तन अभियान हे मासिक काढतात. त्यात विदर्भ तैलिक महासंघाच्या उपक्रमाबरोबरच तेली समाजाच्या मागण्या निवेदन शासन दरबारी आदी बाबींवर जोर असतो विदर्भात आक्रमक असणारी ही संघटना म्हणुनच जनाधार मिळवु शकली विदर्भातील समाज बांधवांचे प्रबोधन त्यामुळे प्रगतीशील झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
रामकृष्ण राठोड :- हे अकोल्याहून प्रगति नावाचे 4 पानाचे मासिक काढत मला आठवते 1964 साली मी 7 वी परीक्षा म्हणजे तत्कालीन फायनल परिक्षा पास झालो. भारत सरकारचा शिक्का असलेले पहिले प्रमाणपत्र आम्हाला मिळाले, या यशाची बातमी प्रगतित छापुन आली. त्यामुळे आम्हाला खुप आनंद झाला. त्या काळात प्रगति मासिक अवघ्या दहा रूपयात वर्षभर मिळत असे 2 नये पैसे तिकीट लावुन ते भारतात कुठेही पाठविता येत असे.