अखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी या ठिकाणी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आखिल तेली समाज संघटनेच्या वतीने निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशन येथे जयंती साजरी करण्यात आली
श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लाडगाव ता वैजापुर येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष श्री. मनोज धनाड सर प्रमुख पाहुणे श्री. साईनाथ सोमवंशी सर श्री.विलास निगळ सर प्रमुख वक्ता श्री.अशोक साळुंके सर श्री. चेतन राजपूत सर तसेच सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते..!!
थोर संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार आदरणीय श्री. हरिभाऊजी बागडे नाना, नगराध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ व भाजपा शहराध्यक्ष श्री.योगेश मिसाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष श्री.सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष श्री.वैभव दुतोंडे व शहराध्यक्ष श्री.अक्षय पाडळकर, उपनगराध्यक्ष श्री.अकबर पटेल, नगरसेवक श्री.शेखर पालकर
ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली या गावी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी. यावेळी कोपर्ली गावात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली निघाली.
आरमोरी:- युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप तर्फे आज दि. ८डिसेंबर २०२२ ला सकाळी ठीक ७:३० वाजता जुना बस स्टँड ,आरमोरी येथे असलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या स्मारकाला राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप ,आरमोरी तर्फे माल्यार्पण व पुष्पर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक