Sant Santaji Maharaj Jagnade
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा. शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 रोजी संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या वधु-वरांचा सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाजातील तरुण युवकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वा. रोकडा हनुमान मंदिर, नवा मोंढा, परभणी येथे समाजातील युवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.
श्री शनि मारुती मंदिर इंदोरी प्रथम वर्धापन दिन 11 मे 2019 वार शनिवार असून नियोजनासाठी दिनांक 4 मे 2019 रोजी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये पुढील कालावधीसाठी श्री शनि मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट इंदोरी च्या अध्यक्षपदी -श्री सचिन नथुराम अवसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पुढील कार्यकारणी खालील प्रमाणे श्री जयंत सूर्यकांत राऊत कार्याध्यक्ष , श्री प्रशांत चंद्रकांत भागवत उपाध्यक्ष
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष, वर्धा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार मा.रामदासजी तडस साहेब तसेच नाशिक शहर व जिल्हा तेली समाजाचे इतर मान्यवरांचा भव्य सत्कार सोहळा नाशिक शहर तेली समाज तसेच सर्व विभाग व जिल्हा तेली समाजाच्या वतीने बुधवार दि.१२/६/२०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन, नाशिक येथे