Sant Santaji Maharaj Jagnade
नगर, ता .२३ - तुळजाभवानी मातेस मुलगी समजल्या जाणाऱ्या भगत कुटुंबियांकडून महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची इतिहासामध्ये प्रथमच श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासनवर १११११ हापूस आंबेची देवीला पूजा मांडली गेली, तसेच देवीच्या मुख्य मंदिरासह भवानीशंकर खंडेराया नरसिंह मंदिर येमाई मंदिर दत्त मंदिर या सर्व मंदिरात देखील पूजा केल्यानंतर भाविकांनी देवीची विशेष पूजा पाहण्याकरिता मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
बीड जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वषीं तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रिय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी सर्व सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी मधील ज्या उतीर्ण विद्याथ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व पालकाचा पत्ता,संपर्क क्रमांक देवून आपले नाव नोंदणी करावी.
नवी दिल्ली येथे अखिल भारतीय तैलिक महासभेच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्या महाराष्ट्राचे मंत्री ना.जयदत्त आण्णा क्षीरसागरयांच्या अध्यक्षतेखाली , केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी छत्तीसगड चे उपमुख्यमंत्री ना.ताम्रध्वज साहू ,खासदार रामदास तडस,खासदार चुंणीलाल साहू,खासदार सुनील कुमार पिंटो,
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा हिंगणघाट व वर्धा जिल्हा द्वारा वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील तेली समाजाचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे एकमेव नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस,अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 23-2-2019 रविवार दुपारी बारा वाजता हरिओम सभागृह हिंगणघाट इथे आयोजित करण्यात आलेला आहे.
काँग्रेसने तेली समाजाची थट्टा केली समाज काग्रेसला त्यांची जागा दाखवून देणार - गोपाळ पाटील
यवतमाळ दि. २६ - निवडणूक म्हटली की पक्षोपक्षीच्या राजकारणात जातीय समिकरण महत्वाचे ठरते. बिहार राजस्थान व गुजरात च्या खालोखाल महाराष्ट्रात ८० लाख तेली समाजाची लोकसंख्या आहे. तथापी एका सव्र्हेक्षणानुसार काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही ते ली समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नसल्याची माहीती प्राप्त झाली आहे. रडत कुंथत चंद्रपुर येथील लोकसभेकरीता बांगळे यांना तिकिट दिल्याचे अगोदर जाहीर झाले.