Sant Santaji Maharaj Jagnade
जय संताजी बहुउद्देशीय तैलीक संघटना अमरावती नेरपिंगळाई चे वतीने आयोजीत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर २०१८ शनिवार ला ठिक सकाळी १०.०० वाजता साजरी करण्याचे ठरविले आहे. तरी आपली सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनिय आहे. कार्यमाची वेळ : सकाळी 10 वा. स्थळ : श्री संत गुलाबपुरी महाराज मंगल कार्यालय, अमरावती, नेरपिंगळाई कार्यक्रमाची रुपरेषा
सालाबाद प्रमाणे याही वर्षी चाळीसगाव तेली समाजातर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा मूर्ती पूजन दिनांक 10-12-2017 रोजी रविवारी सकाळी आठ वाजता ठिकाण श्री संताजी मंदिर तेली गल्ली तेरी बहन चाळीसगाव कीर्तन सप्ताह दिनांक 10-12-2017 ते 17-12-2017 वेळ रात्री 9 ते 11 तर महाप्रसाद दिनांक 17-12-2017 रविवार
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त निमित्त तेली समाज सोयगाव, औरंगाबाद यांनी जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम गुरुवार दिनांक 3/1/2019 रोजी रात्री साडेआठ वाजता संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री दत्त मंदिर समोरील प्रांगण, नारळीबाग सोयगाव जिल्हा औरंगाबाद हे राहिल.
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी व चामोर्शी तेली समाजा च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम दिनांक ०८ डिसेंबर २०१८ (शनिवार) दुपारी १.०० वाजता स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष मा.संजय येरणे प्रसिद्ध साहित्यिक तथा संताजी जगनाडे एक योद्धा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, प्रमुख वक्ते मान. दिलीप तेली प्रसिध्द विचारवंत, जळगांव, किर्तनकार मान. तुषार सुर्यवंशी, सप्तखंजेरी वादक, नागपुर (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)
रविवार दि. ०८/०७/२०१८ रोजी सकाळी १०.३० वा. तेली समाज बांधवांना कळविण्यात येते की, मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे. प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतशेत वाव्हळे (विभागीय अध्यक्ष, पुणे विभाग) सौ. चित्रीताई जगनाडे (नगराध्यक्षा, तळेगाव दाभाडे) श्री, सतिशशेठ वैरागी (विभागीय अध्यक्ष, कोकण)