Sant Santaji Maharaj Jagnade
वरवेली, १० नोव्हें. (वार्ताहर) - सोशल मिडियाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील तेली समाजातील युवा वर्गाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असून तेली समाज युवासंघ जिल्हा रत्नागिरी या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तेली समाजातील युवावर्गाला एकत्र आणण्याचा महत्त्वाचे काम करण्यात येत आहे. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपेने व आशीर्वादाने आम्ही तेली चषक २०१८ चे आयोजन सुध्दा या युवा संघाच्यावतीने करण्यात येत आहे.
तेली (तैलिक) समाजाचा वर-वधु परिचय मेळावा अमरावती जिल्हा तेली (तैलिक) समितीच्यीवतीने १६ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवनात उप वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती पत्रपरिषदेतून समिती अध्यक्ष संजय आसोले, मिलींद शिरभाते, गंगाधर आसोले, सुनिल जयसिंगपुरे, प्रकाश बनारसे, रमेशपंत शिरभाते, चंद्रशेखर पिपळे, चारुदत्त गुल्हाने, संजय रायकर, निलेश शिरभाते, अनुप शिरभाते, विनोद अजमिरे व अविनाश राजगुरे यांनी दिली.
लोहसर/करंजी : गुरुदेव संत नारायण बाबा यांच्या प्रेरणेने सुरू झालेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा सालाबादप्रमाणे दि. ३ जानेवारी २०१९ रोजी तारकेश्वर भैरव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला आहे. समाजातील केलेल्या उल्लेखनीय अशा सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक एवं शैक्षणिक, राजकीय कामगिरीबद्दल व समाजसेवेबद्दल दरवर्षीप्रमाणे
आबलोली :महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा राज्य कार्यकारिणीची राज्यस्तरीय बैठक नागपूर येथे राज्याध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे महासचिव डॉ. भूषण कर्डीले, कोषाध्यक्ष गजानन शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ३०० पदाधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर - तेली समाजातर्फे २ डिसेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा झोपडी कैंटीन येथील माऊली सभागृहात होणार आहे, अशी माहिती संयोजक विजय काळे, प्रा. सोमनाथ बनसोडे यांनी दिली. तसेच जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अहमदनगर तेली वधू-वर डॉट कॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आलेली आहे. संबंधितांनी या वेबसाईटवर नोंदणी करावी.