Sant Santaji Maharaj Jagnade
जिल्ह्यातील तीन तालुक्यातुन आमदार पदासाठी तेली समाज तिकीट मागु शकतो अशी परिस्थीती आहे. स्वत: किसन घोडके भाजपा मधुन आमदार की साठी उत्सुक असुन पुढील काळात समाजाचे वतीने तिकीट मागणीसाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येईल
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे.
सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुरेखा हाडके यांनी आपला अहवाल मांडताना नमुद केले की, समाजातील पुरूष मंडळींनी महिलांना देखील समाजकार्य करण्याची समान संधी द्यावी. संघटनेच्या कार्यात महिलांचा दिवसेंदिवस सहभाग वाढत असुन लवकरच शिरवळ तेथे महिलांचा विभागीय कार्यक्रम घेण्याचा विचार चालु आहे.
- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.
श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा
मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले.