Sant Santaji Maharaj Jagnade
![]()
समाजाच्या मतावर धनदांडगे व जातदांडगे मोठे होतात ते निवडणूकी नंतर समाज हिताचा निर्णय घेत नाहीत. उलट समाजाला मत भेदात ठेवून गुंतवत ठेवतात ही खरी आपल्या मागासलेपणाची पाळेमुळे. ही नष्ट करण्याचा विडा तडस साहेबांनी उचलला देवळी नगर पालीकेचे नगर सेवक नगराध्यक्ष १२ वर्षे आमदार व आज खासदार ही वाट त्यांनी निर्माण केली. होय मी तेली आहे. आणि मी तेली म्हणुन निवडणुक रिंगणात आहे मी जिंकणार ते तेली म्हणुन मी झटणारा तेली समाजासाठी ही जिद्द त्यांनी निर्माण केली. ही जिद्द त्यांनी आम्हा सर्वांना दिली.
-: भगवान मिटकर, सचिव म. तेली महासभा औरंगाबाद विभाग
श्री. संत संताजी तिळवण तेली समाज ट्रस्ट ही संस्था पुर्ण मराठवाठ्याची अस्मीता ही गौरवशाली परंपरा विस्तारीत करावयाची होती. आमचे काही प्रश्न होते या व इतर समाजाच्या प्रश्ना बाबत मुंबई येथे मंत्रालयात जावे प्रश्न ते सोडविण्यास सहकार्य करीत. मराठवाड्यातील अनेक प्रश्न कै. काकु व आ. जयदत्त क्षिरसागर यांच्या बरोबर चर्चा करून मार्गस्थ लावत असत.
शिवाजी क्षिरसागर, अध्यक्ष सेवा आघाडी
![]()
माझी सर्व नोकरी पोलिस खात्यात गेलेली अनेक जबाबदार्या पेलताना माणुस वाचता आला, माणुस समजला. माझा समाज तेली, मी एक तेली ही भावना जीवनभर जपलेली. या वाटेवर तेली महासभा भेटली, मा. खासदार तडस साहेब भेटले. रामदासजी हे एक पैलवान पैलवान हे जरा तापट आसतात. पण विदर्भ केसरी असलेले हे बांधव अतिशय शांत स्वभावाचे मला त्यांच्या जवळ वावरता आले व काम ही करता येते हे त्यांचे वैशिष्ठ.
तळेगाव दाभाडे :- साहित्य कला आणि सांस्कृतीक मंडळाचे विश्वस्त व अध्यक्ष व जेष्ठ कवी श्री. सहदेव मखामले यांच्या पाचव्या काव्य संग्रहाचे प्रकाशन शनीवार दि. ११/४/२०१५ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठ कोलकर कॉलनी तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होत आहे.
अहमदनगर - राहुरी तालुका खादी ग्रमोउद्योग संघाची २०१५ -२०२० ची संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध झाली आहे.