सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.