Sant Santaji Maharaj Jagnade
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.
मुंबई :- महाराष्ट्र शासनाने नुकतेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार जाहीर केले आहेत यामध्ये बृहनमहाराष्ट्र तेली समाजाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खोंड यांना शासनाने यावर्षीचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला आहे.
श्रोते झाले मंत्र मुग्ध
श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे (रजि.) श्री.संताजी भगिनी मंच ठाणे, श्री संताजी युवा मंच ठाणे आणि तेली समाजातील शासकीय अधिकारी ठाणे वर्गाच्या सहकार्याने शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वरवेली - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष रामदास तडस, महासचिव भूषण कर्डिले, गजानन शेलार यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई विभाग अध्यक्ष विलास त्रिंबककर यांच्या आदेशाने तरूण, तडफदार व सामाजिक कार्यकर्ते प्रविण विजय रहाटे (गुहागर) यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई युवाध्यक्षपदी निवड झाली.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, ठाणे विभाग व कल्याण तेली समाज,कल्याण (प.) तर्फे मा.नामदार श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जाहीर सत्कार
कल्याण - तेली समाजाचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली २०२०-२०३५ या स्वर्णिमकाळात भारत हा जगातील तिसरी महासत्ता असेल..व त्यासाठी तेली समाजाने आपल्या पाल्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत मुले घडविणे हीच काळाची गरज आहे..!-मा.श्री चंद्रशेखरजी बावनकुळेसाहेब,उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री (महा.राज्य)