पंढरपुरच्या विठ्ठुराायाला वारकरी सांप्रदाय आणि त्यांचा महिमा वर्णन करणारे अद्वितीय असे हे संत वांग्डमय हा मराठी संस्कृतीचा अनमोल असा गाभाच आहे असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक राजकीय स्थालांतरे झाली एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात परकीय सरकारे पण आली तरीही विठु माऊली च्या पंढरपूर वारीची परंपरा आज हजारो वर्ष वारकरी सांप्रदयात चालतच आलेली आहे.
आबलोली : गेली 75 वर्षे तेली युवक संघाच्या माध्यमातून गुहागर शहरात समाज संघटनेचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून, हीच संघटीत युवा शक्ती समाजाचे वैभव आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी यांनी काढले. गुहागर शहरातील तेली युवक संघ, गुहागर - मुंबई यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
तेली समाजातील आदर्श समाजरत्न रोहीदास चंद्रकांत उबाळे वाघोली, पुणे या शहर तिळवण तेली समाजातील आधुनिक विचारसरणी असलेले दानशुर युवा नेतृत्व, केवळ समाजातीलच नव्हे, तर जात-पात, धर्म असा भेदभाव नकरता गरजुंच्या मदतीसाठी स्वतः होऊन धावणारा कार्यकर्ता आशी ओळख असणारे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे जे आहे. ते परमेश्वराच्या कृपेन आहे. त्याचा इतरांना देखील उपयोग झाला पाहिजे
रत्नागिरी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा. जिल्हा तेली समाज सेवा संघ रत्नागिरी व तेली समाज सेवा संघ तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे या वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 19-4 -2018 रोजी बालाजी मंगल कार्यालय शांती नगर नाचणे रोड रत्नागिरी येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
महा.राज्य मागासवर्गीय आयोगापुढे भावी मराठा आरक्षणामुळे निर्माण होवू घातलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीसाठी तेली समाजातर्फै महा.प्रांतिक तैलीक महासभा ठाणे व कोकण विभागातर्फे प्रतिनिधि उपस्थित होते..!