Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 4 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
समजाचा ठेका घेऊन फिरणारे एक समाज बांधव त्यांच्यातील गुणांना मी दाद देतो. त्यांच्या धडपडीला जमेल तेवढी सोबत ही देतो. पण परवा एका प्रसंग घडला त्याचा उलगडा करतो. संभाजी म्हसे हे निवृत्त न्यायाधीश आहेत. या पुर्वी ते लाभाच्या पदावर होते. भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात अडकले म्हणुन पाय उतार व्हावे लागले जन्माने मराठा आहेत. मराठा समाजातील अंदोलनातील आहेत. मराठा अभ्यासगटाचे आहेत. त्यांना तर मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवले. सदस्य असलेल्या प्रा. भुषण कर्डिले यांचे जरूर अभिनंदन केले. पण विविध ओबीसी संघटना पोलिस परवानगी घेऊन जात दांडगे व भ्रष्ट असलेल्या म्हसे यांचा राजीनामा आम्ही मागण्यास गेलो तेंव्हा हे समाज बांधव भेटले.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 2 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
2/3 वर्षापुर्वी वांझोट चिंतनाच बुजगावण शिबीर भरवले जात होते. एका जाणत्या पदाधीकार्याला विचारणा केली यातून समाजाचे हीत काय साधले ? एक हितच साधले पदासाठी पळणारी मंडळी जवळ आली. परिवर्तन हक्कासाठी लढणे हा बाणा उभांरण्याचे ध्येय कधीच संपलेले होते. काही मंडळींनी समाजाची खाणे सुमारी केली. शेकडो बांधवांनी पायीट करून माहिती गोळा केली काहींनी पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. काहींनी भरगच्च कार्यक्रम करून त्याला रूप दिले. यातून साध्य काय ? याचा उपयोग एकच लग्नपत्रीका पाठविण्यासाठी. एक मेकाला संपर्क करण्यासाठी. झालेच तर माहितीतून पुन्हा पदासाठी पलटण निर्माण होऊन त्यासाठी आडवा आडवी. किती साधी सोपी दिशा नेते मंडळी ठेवतात.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 1 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष दिले तर समोर येते त्यांचे प्रथम अभिनंदन करूया. अभिनंदन करणार कुणाचे आणी सलाम करणार कुणाला ? समाज पातळीवर संघटनेवर मांड ठेऊन उधळणार्या नेत्यां च्या घोड्याची शेपटी पकडून पळणार्याला लाथा बसल्या नका तोंडात धुराळा गेला तरी घोड्याच शेपट न सोडणार्या महान समाज सेवकांचेसमाज संघटनेच पद मिळवावे लागते किती चेंगरा चेंगरी किती पळवाटा, किती आडवाटा यावर आपटत मिळवलेले पद एका बाबत तो विक्रमच आसतो. आशा विक्रम विराचे.
आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी 19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्यात व्यक्त केले.
राजगुरू नगर - खेड तालुका तैलीक महासभेची सभा उ. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. महादेव फल्ले सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी सक्षम कार्यकारणी होण्यासाठी सर्वश्री राजेंद्र खळदकर मा. सरपंच, श्री. पिंगळे सर यांनी प्रास्तावीक केले. जेष्ठ उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे, व जिल्हा सचिव प्रदिप कर्पे यांनी मार्गदर्शन केले. तालुका अध्यक्ष श्री. गजानन घाटकर व जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश गिधे यांनी आपली विचार मांडले श्री. विजय रत्नपारखी यांनी संघटनेचे महत्व सांगीतले