दिल्ली प्रदेश तैलीक साहू सभेच्या वतीने रविवारी दि. २७ मार्च २०१६ रोजी वसंतोत्सव व होली मिलन हा कार्यक्रम अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय उपाध्क्ष प्रल्हाद मोदी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. रामदास तडस, महामंत्री रामलाल गुप्ता, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॅ. प्रकाश सेठ, शुषमा शाहू व दिल्ली तैलिक साहू सभेचे अध्यक्ष एस राहुल उपस्थित होते.
पुणे :- श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या समाजाच्या शिखर संस्थेच्या सहचिटणीस पद नुकतेच रिक्त होते. संस्थेच्या कार्यकारणीची मिटींग श्री संत संताजी मंदिरात नुकतीच संपन्न झाली या वेळी संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळ शेठ जगनाडे यांनी श्री. दिपक सदाशीव पवार यांची नियुक्ती सहचिटणीस पद केली आहे.
महाराष्ट्राला समाज सुधारणेच्या विचारांचा मोठा वारसा लाभला आहे. स्त्रीयांना सामाजिक रुढीच्या बंधनातुन मुक्त करण्याच्या चळवळीचे आद्य प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांनी आपल्या कार्याला पुण्यातुनच सुरूवात केली स्त्रियांच्या जिवणातील अज्ञानाचा अंधार दुर करूण शिक्षणाचा प्रकाश त्यांच्या जिवणात पसरविण्याची सुरूवात क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच मातीतुन केली. ज्या देशात, समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मान दिला जातो तो देश आणि समाज प्रगती पथावर जातात मात्र जेथे स्त्रियांकडे दुर्लक्ष केले जाते तो देश तो समाज पिछाडीवर रहातात हा जगाचा इतिहास आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग7)
या देशाचे पंतप्रधान मोदीच यावेत ही वातावरण निर्मीती जेंव्हा सुरू होती तेंव्हा आजचे वाचाळ विर गप्प होते. घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला बसवणे व विकास साधने ही ध्यये मा. नरेंद्र मोदींचे होते व आज ही आहे ही मान्य करू. आपण सर्वांनी समन्व्य साधला मोदींच्या विकासा बरोबर मत देताना समोर हे वाचाळ विर भगावतांचा आरक्षणाचा कडवट पणा विसरता येतो हे मोदी वादळात स्पष्ट झाले. आणी क्षत्रीय किंवा ब्राह्मण नव्हे तर फक्त जन्माने मागास वर्गीय असलेल्या मा. मोंदीच्या विकासात प्रेमात देश सामावला गेला. हे वास्तव मा. मोदी पंतप्रधान होण्यातील आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग6)
स्वातंत्र्यात खरा इतिहास लिहीला जाईल ही अपेक्षा मागेच संपली. उलट आज नवा इतहास रचण्न्याचे कपटकारस्थाने उभे केले जातात या कारखान्यातुन जे बाहेर पडेल व रूजवले जाईल तेंव्हा मध्ययुगीन काळ प्रतिष्ठेचा बनला असेल. समन्वय बौद्ध काळा नंतर हा समनव्य शंकराचार्याचा. हा समन्वय मोंगल आक्रमण नंतरचा हा समन्वय औरंगजेबानंतरचा प्रत्येक ठिकाणी यांनी विश्वास संपादन केला. ज्यांच्यावर राज्य करावयाचे आहे.