आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 4 ) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
आणीबाणीच्या काळातच त्यांचे कॉलेज शिक्षण सुरू होते लोकशाहीची झालेली परवड त्यांनी पाहिली होती. शिक्षण पुर्ण होताच देवळी येथे ते आले. दमलेल्या वडीलांच्या बरोबर शेतीत त्यांनी लक्ष घातले. तांबड्या मातीत ते रमले दि.16 जुन 1977 मध्ये सौ. शोभाताई यांच्या बरोबर विवाह झाला संत गाडगे बाबा यांच्या सामाजीक परिवर्तनाचा वसा बाळगणारे चहु बाजुची माणसे ओळखून त्यांच्याशी मैत्री ठेवणारे आपले वृद्ध आई वडिल यांची काळजी घेणारे. मी घराचा कर्ता आहे याची जाणीव ठेऊन धडपडणरे कुस्ती हा तडसांचा पिंड आहे.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 3) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
देवळी गावात शिक्षण घेता घेता खेळ खेळताना मनात अजुन एक गोष्ट नोंदवली गेली. कबड्डी, खोखो या सारखे खेळ सांघीक आहेत तर कुस्ती हा खेळ मुळात एकट्या पुरता आणी मराठी मातीचा हा मर्दानी खेळ. ते गावातील आखाड्यात रमु लागले जोर बैठका करीता करीता ते तांबड्या मातीत उतरले. या मातीत चितपट कुस्ती करिताना डावपेच लागतात. समोरचा ही तसाच आसतो. तो तसा आसतो म्हणुन त्याच्या डावाला प्रती डाव करणे यातच यश आसत. आगदी एस.एस.सी. परिक्षा उतर्रण होई पर्यंत ते तांबड्या मातीत असत. अजुबाजुच्या कुस्त्यांच्या फडावर ते सामील होत. आपल्या तयारीची चुणूक दाखवत आसत. चंद्रभानजी तडस यांनी आपल्या मुलाचे गुण हेरले.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 2) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
वर्धा ते यवतमाळ रस्त्यावर देवळी एक छोटे गाव या गावात चंद्रभानजी तडस व कौशल्याबाई या कुंटूंबात त्यांनी जन्म घेतला. घराला घर पण येण्यासाठी पुर्वपार असलेल्या शेतीत राबावे. लहरी पावसाच्या भरवश्यावर जे मिळेल त्यावर घर चालवावे घरातील पेटती चुल विझु नये ही मात्र दोघांची धडपड रोजची आसे. देवळीच्या प्राथमीक शाळेत ते शिकत होते. शाळेला सुट्टी असेल तेंव्हा रामदासजी आई बरोबर शेतात जात. आगदी एप्रिल, मे चे कडकडीत उन्ह ही अंगावर झेलत आसत.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 1) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
एक तेल्याचे पोर, एक शेतकर्याचे पोर, ते ही विदर्भातले, मध्यप्रदेशात तेंव्हा हा विदर्भ सी.पी.अॅण्ड बेरर म्हणुन समजला गेलेला हा भाग. निसर्गाने झिडकारलेला, शासानाने तडीपार केलेला हा भाग. आचार्य विनोबा भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती सुशील नायर सहकार महर्षी दादासाहेब देशमुख यांची कर्मभुमी या भुमीत 1 एप्रिल 1954 मध्ये खा. रामदासजी तडस यांचा जन्म झाला.
मदनसिंग चावरे, जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जातीजमाती भाजपा
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भुदान यज्ञाचे प्रणेते जगविख्यात आचार्य विनोबाजी भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती डॉ. सुशील नायर आणि सहकार महर्षी स्व. दादाजी देशमुख यांच्या कर्मभुमीत देवळी येथे दि. 1 एप्रिल 1954 रोजी रामदासजी तडस यांचा जन्म झाला. वयाची 62 वर्ष पुर्ण करणार्या या पैलवानाचा आजचा उत्साह एखाद्या तरुणास लाजवेल एवढा आहे. आज रामदासजींचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना समस्त जनतेसोबत माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा !