९ फेब्रुवारी २००९ रोजी सोमवारला गोंदिया शहरातील धोटे बंधू विज्ञान महावद्यालयात भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तेली समाजाचे दैवत संत संताजी जगनाडे महाराजांच्या टपालतिकिटाचे विमोचन करण्यात आले.
महाराष्ट्रातील करोडो तेली समाजबांधवांची मागणी यावेळी पूर्ण झाली असली तरी या तिकिटाच्या प्रकाशनासाठी महाराष्ट्रातील तेली समाजबांधवांचे अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी दिसून येते. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होताना संताजी महाराजांवरील तिकीट प्रकाशनापर्यंतची वाटचालीचा इतिहासही माहिती करून घेणे आवश्यक आहे.
विदर्भात तेली समाज जवळपास १९ टक्के आहे.
प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार्या संत तुकारामाचा पट्टशिष्य असलेला संतू ऊर्फ संताजी जगनाडे यांचा जन्म ९ डिसेंबर १६२४ रोजी चाकण, जि. पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनवणे असून जगनाडे या टोपणनावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. वडील विठोबा आणि आई मथाबाई यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. संताजीला शिक्षणासाठी घरीच व्यवस्था करावी लागली. लेखन-वाचन-अंकगणित याचेही व्यावहारिक शिक्षण संताजीला घरीच मिळाले.
संताजी महाराज अभंग व संत तुकाराम
चरिता गोधन । माझे गुंतले वचन ॥1॥
आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥
तिनमुठी मृतिका देख । तेंव्हा लोपविले मुख ॥3॥
आलो म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोका ॥4॥
संत संताजी महाराजांचे अभ्ांग आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
अंगी जोडियेला मन पावनाचा ॥1॥
भक्ती ही भावाची लाट आयकली ।
शांती शिळा ठेवली विवेकाची ॥2॥
आरती संत संताजी महाराजांची गाणी
आरती संतू संता । चरणी ठेविला माथा ।
साधूवर्ण कृपावंत । अभय देई तत्वता ॥1॥
जन्मोनिया चाकणाशी । धन्य केली पंचक्रोशी ।
शरण तुकयासी जाय । धन्य धन्य देही होय ॥2॥