Sant Santaji Maharaj Jagnade
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 4) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
महाविद्यालयीन :- पुढील शिक्षणासाठी ते ढाक्याला आले. शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे त्यांना शिक्षण घेता येऊ लागले. मेघनाद ढाक्याला आले. त्यावेळेस बंगाल खदखदत होता. त्यांचे निमित्त होते लार्ड कर्झन ने केलेल्या बंगालच्या फाळणीचे (1905) या फाळणीच्या विरोधात सर्व बंगाल प्रांत एक होऊन लढत होता. स्वदेशीचा अंगीकार, परदेशीचा बहिष्कार, सरकारी महाविद्यालयावर बहिष्कार, परदेशी कपड्यांची, परदेशी मालाची होळी. मेघनाद यांनीही स्वत:ला या राष्ट्रीय आंदोलनात झोकून दिले. त्यामुळे त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले. पुन्हा त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली व त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 3) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
मेघनाद यानें शिक्षण न घेता आपला किरणा दुकानदारीत लक्ष घालावे असे त्यांच्या वडिलांचे विचार पण आपले मोठे बंधू जयंत व प्राथमिक शिक्षक यांच्या प्रयत्नाने व प्रेरणेने डॉ. मेघनाद यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणास गती मिळाली. शिवरातली गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती म्हणून गावापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिमुलीया येथे माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना डॉ. अनंतकुमार दास यांच्या कडे रहावे लागले. डॉ. अनंतकुमार दास यांनी त्यांची मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 2) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
![]()
जन्म :- आंतरराष्ट्रीय र्कितीचे खगोल शास्त्रज्ञ, लोकसभा सदस्य, प्रकाश दाब मोजमाप यंत्राचे जनक, साहा सिद्धांताचे जनक, नियोजन मंडलाचे सदस्य, साहा नुअक्लिअर फिजिक्स संस्थेचे संस्थापक, भारतीय सौर पचांगाचे जनक, भारतीय विज्ञान मंडळाचे सदस्य, रॉयल सोसायटी लंडन सदस्य, भारतीय विज्ञान काँग्रेस अध्यक्ष (1934) स्वातंंत्र सेनानी, अलाहाबाद विद्यापीठ प्राध्यापक असे परीपुर्ण व्यक्तिमत्व, ऐस्तपैलु कामगिरी असलेले डॉ. मेघनाद साहा 6 ऑक्टोबर 1893 साली सद्या बांगलादेशातील ढाका जिल्ह्यातील शिवारातली या गावी झाला.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 1) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
आपल्या नेतृत्वाने विज्ञान क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणार्या भारतीय शास्त्रज्ञात या शतकातील एक अग्रेसर नाव म्हणजे डॉ. मेघनाद साहा, डॉ. साहा हे असामान्य शास्त्रज्ञ होते. मेघनाद सहा हे आधुनिक पदार्थ विज्ञान शास्त्रातील अग्रेसर भारती शास्त्रज्ञ होते त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. त्यापैकी पहिली अडथळा ग्रामीण असल्यामुळे शहरी विद्यार्थ्यांशी जुळवूण घेणे. दुसरा अडथळा नवीन सुरू झालेल्या शास्त्र महाविद्यालयातील प्रयोग शाळा व मार्गदर्शकाचा आभाव. तीसरा अडथळा आर्थिक परिस्थिती व त्याचप्रमाणे वंश/जाती भेद या सर्व अडथळ्यांवर मात करीत त्यांनी मेघगर्जना करीत प्रत्येक क्षेत्रांत यश मिळविले.
पुढे तिळवण तेली समाज अध्यक्ष पद भुषविण्याची संधी त्याना मिळाली. या पदाच्या माध्यमातुन त्यांनी समाज कल्यानास्तव अनेक उपक्रम राबविले. समाजोद्धाराची अनेक कामे करताना धार्मिक उपक्रम, हनुमान जयंती, मुंबई बाजार येथील समाजाचे हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जीवनाच्या अखेरच्या टप्यात ते अंत्यंत समाधानी होते.