वर्धा: देश मंगळावर अंतराळ स्थानक आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न दाखवतो, पण दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली अस्पृश्यता आजही कायम आहे, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राम नवमीच्या दिवशी घडली आणि ती भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्यासोबत घडली, ज्यामुळे सर्वत्र संतापाचे लाट उसळल्या आहेत.
वाड़ी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) नागपुर का नाम श्री संत जगनाडे महाराज से बदलने की प्रस्तावित योजना को लेकर श्री संताजी अखिल तेली समाज संगठन ने तीव्र विरोध जताया है। इस विरोध के तहत संगठन ने मांग की है कि ITI का नाम वैसे का वैसा ही बना रहना चाहिए।
सिंदेवाही, ता. २६: नागपूर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला विदर्भ तेली समाज महासंघाच्या सिंदेवाही-लोनवाही शाखेने कडाडून विरोध दर्शवला आहे. महासंघाने सरकारला ठाम इशारा दिला आहे की, हा निर्णय त्वरित मागे घेतला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
नागपूर: संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी दिनांक १८ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव दिला.
राष्ट्रीय तेली समाज महासंघाने ऑल इंडिया तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी नवीन सभासद नोंदणीची मोहीम हाती घेतली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर (बीड) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशभरात राबविली जात आहे.