चामोर्शी - संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज ते संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांनी समाजाला जो विचारांचा आधार दिलेला आहे, तोच आधार समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारा आहे. त्यासाठी प्रत्येकांनी संतांचे विचार अंगीकारावे असे प्रतिपादन युवा नेते मधुकर भांडेकर यांनी केले.
यवतमाळ - समाजातील लोकांमध्ये नाते अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथील तेली समाजाच्यावतीने आयोजीत कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात सर्वाधिकारी दामोधर पाटील गुरुकुल मोझरी आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यवतमाळ : जिल्ह्यात गेली अनेक दशकापासून कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा झाला नव्हता. समाजाला दिशा देण्याचे काम अनेक समाज बांधवांनी केले. ही मेळावे काळाची गरज असून समाजाला दिशादर्शक ठरतोय व आपसातील नाते आणखी घट्ट करतो, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते. कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे.
यवतमाळ तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा ओबीसी जन मोर्चा संताजी नागरी सहकारी पतसंस्था व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने संताजी चौक या ठिकाणावरून अगदुरु तुकोबारायाचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने रैलीचे नियोजन करण्यात आले, संताजी चौक येथे संताजी महाराजांच्या चित्राचे पूजन केल्या गेले सदर पूजनाच्या वेळेस संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामलसचिव विलास काळे
संत साहित्याने समृद्ध असेल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ अमृत विचार वाणीतून समाजच्या उत्थानासाठी मार्गदशन केले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील संत तुकडोजी महाराजांपर्यंत अशा अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या बौद्धिक विचारांनी संत साहित्याला समृद्ध केले आहे.