महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती यांचे वतीने आज ०९/०१/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ०७ वाजता राजकमल चौक येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजीत केला होता यावेळी श्री. किरणभाऊ पातुरकर व श्री प्रशांतभाऊ देशपांडे यांनी माहाराजांची पूजा करून संताजी माहाराज यांची आरती करुण आपले मनोगत व्यक्त केले
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, उमरेड जि. नागपूर, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्य भव्य रक्तदान शिबीर मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ ला वेळ : ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत स्थळ: साने गुरुजी जेष्ठ नागरीक भवन आशिर्वाद मंगल कार्यालय जवळ, उमरेड
- अनुज हुलके, विदर्भ तेली समाज महासंघ स्थापन होण्यापूर्वी तेली समाजाला हीन लेखणाऱ्या काही घटना घडल्या. त्याच्या निषेधाचे तीव्र पडसाद समाजात उमटले. त्यानंतर तेली समाज आणि इतरही काही शेतकरी-कष्टकरी असलेल्या शुद्र जाती आणि स्त्रियांबद्दल हीन लेखन केलेल्या साहित्याची चर्चा होऊ लागली. यात प्रामुख्याने मनुस्मृतीचा उल्लेख होऊ लागला. आणि हिन लेखल्या गेलेल्या समाजात एकप्रकारे अस्मिता जागृत होऊ लागली.
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण पश्चिम व संताजी बिग्रेड तेली समाज महासभा आयोजित संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम - रविवार 14/01/2024 ला दुपारी 3 वाजता पासुन, स्थळ - भगवती सभागृह, गजानन मंदीर समोर, त्रिमुर्ती नगर, नागपूर. तेली समाजाचे आराध्ये दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संताजी कल्याणकारी मंडळ दक्षिण-पश्चिम नागपूर तर्फे करण्यात आलेले आहे.