विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर, शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच, व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे ,
प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.
चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर गुणवंत गौरव समारंभ २०१९ दिनांक रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ ला दुपारी २.०० वाजता श्री संताजी सभागृह, भानापेठ वार्ड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०१८-२०१९ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास आपली सर्व तेली समाज बांधवानी उपस्थित राहावे हि विनंती आयोजका कडुन करण़्यात आलेली आहे.
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 26 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रभरातून व्यावसायिक शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना बारा लाख रुपये एवढया रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 446 विद्यार्थ्यांना 1 कोटी 20 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा हिंगणघाट व वर्धा जिल्हा द्वारा वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील तेली समाजाचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे एकमेव नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस,अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 23-2-2019 रविवार दुपारी बारा वाजता हरिओम सभागृह हिंगणघाट इथे आयोजित करण्यात आलेला आहे.