तेली समाजातील महान विभुती (भाग 8) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
संताजी महाराजांना तेली समाजाने आपले दैवत म्हणून स्विकारले आहे. तुकाराम महाराजांच्या 14 टाळकर्यांपैकी सर्वात महत्वाचे शिष्य असा त्यांचा लौकिक आहे. ते तुकारामांसोबत कायम सावली सारखे असत. संताजी जगनाडयांमुळेच तुकाराम लोकांना कळले. म्हणुनच म्हणता, होता संताजी सखा म्हणून वाचली गाथा आणि कळला तुका.
साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभेची बैठक विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य ना. जयदत्त क्षीरसागर यांनी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व विदर्भ भंडारा जिल्हा अध्यक्षपदी सुरेश गोपीचंद धुर्वे यांची निवड केली आहे.
तेली समाजातील महान विभुती (भाग 6) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात पिंपळगाव येथे गोटीरामबाबांचा जन्म झाला. अतिशय हुड असणारा हा मुलगा मंगलदास बाबांच्या सहवासात आल्यावर बदलून गेला. रोज सकाळी सुर्योदयापूर्वी उठायचे 4 मैलांवर असणार्या हमरापूर गावी पोहत गोदावरीत स्नान करायचे आणि ओल्या धोतरावर मारूतीला प्रदक्षिणा घालायची असा त्यांचा क्रम सुरू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि बुद्धीजिवी वर्ग, सर्व डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षकगण, शेतकरी बंधु, व्यवसायीक तसेच सामाजीक व राजकीय पुढारी आपणा सर्वांना २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दिनांक २१/०७/२०१९ रोज दुपारी १२.०० वाजता स्थळ श्री संताजी वसतीगृह, मुल रोड, चंद्रपूरला आमंत्रित करीत आहोत.