Sant Santaji Maharaj Jagnade
शिर्डी - देशभरातील तेली समाजाने देशासाठी मोठे योगदान दिलेले असुन समाजातील जाणत्यांनी पुढाकार घेवून पोटजातींमधील रूदी परंपरांना फाटा देवून विवाह संबंध होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्यावसायिक आणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश पन्हाळे यांनी केले. येथे तेली समाज राज्य स्तरीय वधु-वर पालक मेळावा आणि
इंदिरानगर - येथील कलानगर परिसरातील संताजी समाजमंदिरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची ३९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संत शिरोमणी श्री संताजी महाराजांच्या मूर्तीचे इंदिरानगर तेली समाजाचे अध्यक्ष मनोज कर्पे यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. त्यानंतर अभिषेक व आरती झाली. यावेळी मान्यवरांनी मूर्तीस पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण केले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंतांचा सत्कारचांदवड शहरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव जगन्नाथ राऊत, अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष गणेश वाघ यांच्या हस्ते करण्यात येऊन संताजी महाराजांच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. १५ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ अखंड हरिनाम सप्ताह.
अकोला, ता. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जंयती उत्सव गुरुवार, ता. ८ डिसेंबरला राठोड पंच बंगला शिवाजीनगर अकोला येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.