धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ-वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे.
लातूर वीरशैव तेली समाजाच्या वतीने मा. ना. श्री अमित देशमुख साहेब ( पालक मंत्री तथा वैदकीय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. आपण आपल्या समाजातील जेष्ठ नागरिकांना आव्हान केले होते. त्यानिमित्ताने आपल्यातील 18 जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी आज जगप्रसिद्ध डॉ. श्री तात्याराव लहाने साहेब यांच्या हस्ते मोतिबिंदु शस्त्रक्रिया खालील जेष्ठ बांधवांची करण्यात आली.
धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ-वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे.
लातूर वीरशैव तेली समाजातर्फे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सुभाष चौक लोखंडे बिल्डिंग येथे समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री मनमथ आप्पा लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी बसवेश्वर कॉलेज येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्यांना बंधू-भगिनींना यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.