नाशिक - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी दक्षिण नाशिक जिल्हा अध्यक्षपदी सुरेश पिंगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी सुरेश पिंगळे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यातून संघटना वाढीसाठी भरीव कामगिरी केली असल्याने
धुळे - खान्देशातील तेली समाजामध्ये अग्रगण्य असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ या संस्थेच्या साक्री तालुका अध्यक्षपदी साक्री येथील युवा कार्यकर्ते युवराज पंढरीनाथ महाले यांची निवड करण्यात आलेली आहे. मंडळाचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी यांचे शिफारशीवरून अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांच्या आदेशाने सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी ही निवड करीत असल्याचे जाहीर केले आहे.
अकोले तालुक्यातील युवा उद्योजक तुषार ओंकार दिवटे यांच्या विवाह सोहळ्यात तिळवण तेली समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने खर्चाला फाटा देऊन तिळवण तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला.
पुणे, - प्रदेश तेली महासंघाची नुकतीच जिल्हा, तालुका व पुणे शहर पातळीवरील कार्यकर्ता बैठक कर्वेनगर येथील श्री संताजी सभागृह येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष माकडे, तर प्रमुख पाहुणे प्रिया महिंद्रे, महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुडे, उपाध्यक्ष विजयभाऊ रत्नपारखी, युवा उपाध्यक्ष सागर व्हावळ, महिला आघाडी उपाध्यक्ष नीलम घाटकर, निशा करपे, उज्वला पिंगळे उपस्थित होत्या
धुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व कोषाध्यक्ष गजानननाना शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली