Sant Santaji Maharaj Jagnade
अर्धापूर तालुका तेली समाज - श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन तरूणांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालवून भविष्यातील आवाहने पेलविण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अॅड. किशोर देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र तैलिक युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत गटनेते अॅड. किशोर देशमुख हे होते.
नाशिक तेली समाज : संताजी महाराज जगनाडे यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सरकारने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबतचे परिपत्रक काढल्यानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने याबाबत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. यानिमित्ताने प्रतिमापूजन, मिरवणुकांसह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
मालेगाव : महानगर तेली समाज व श्री संताजी महाराज उत्सव समितीतर्फे अंबिका मंदिरात संताजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुकीनंतर प्रमुख पाहुणे आमदार दादा भुसे यांच्या हस्ते आरती व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडू चौधरी, कोषाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी, मालेगाव महानगर तेलिक महासभा, संताजी ब्रिगेड संघटना
अंदरसूल नाशिक येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी संत शिरोमणी जगनाडे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे संताजी युवक मित्रमंडळाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपसरपंच शेखर कर्डिले, कैलास व्यवहारे, अरुण केदार, ए. टी. शिंदे, राहुल केदार आदीसह मान्यवर उपस्थित होते.