Sant Santaji Maharaj Jagnade
अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने दि.2/12/2019 रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची महाराष्ट्र शासनाने दि.8 डिसेंबर या तारखेला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थामध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरवात करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा, पिंपरी चिंचवड शहर संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०१९ मैळाव्याचे ठिकाण रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी राजमाता जिजाऊ सभागृह सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत ईएसआय हॉस्पीटल समोर, मोहन नगर, चिंचवड स्टेशन, पुणे-४११०१९
सांगली - स्मशानभूमी, समाज मंदिर यासह तेली समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा तेली समाज महासंघाच्यावतीने रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे करण्यात आली. तेली समाज महासंघाचे युवा सदस्य विजय संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी क्षीरसागर यांची मुंबईत भेट घेतली. त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्हा तेली समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी आज अखेर मान्य दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर येथे पार पडला या कार्यक्रमाचे उपस्थित विशेष विनंती अतिथी म्हणून जामनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन