Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेली मागणी आज अखेर मान्य दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संत जगनाडे महाराज तेली समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा हिवरखेडा रोड गोपाल नगर जामनेर येथे पार पडला या कार्यक्रमाचे उपस्थित विशेष विनंती अतिथी म्हणून जामनेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
औरंगाबादला, प्रतिनिधी, औरंगाबाद येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आज उघोग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या कडे तेली सेना, तेली समाजाच्या वतीने करण्यात आली.अतुल सावे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद मध्य मतदार संघात तेली समाजाचे 75 हजार कुटुंबे आहे. तेली मतदार लक्षणीय आहे. हा समाज नेहमी भारतीय जनता पक्षा सोबत राहत आलेला आहे.
अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर, भव्य मोफत वधु - वर पालक परिचय मेळावा, अहमदनगर - 2019, रविवार दि. 1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सर्व समाज बंधू-भगिनींनो... महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरामध्ये भव्य मोफत तृतीय राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा होत आहे. या निमीत्ताने आपले स्वागत करण्यास अ.नगर शहर व जिल्हा तेली समाज, संताजी विचार मंच अहमदनगर उत्सुक आहे. तरी आपल्या मुला-मुलींची नाव नोंदणी करावी हि नम्र विनंती.