Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाज शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रिडा मंडळ, पंचवटी श्री संताजी मित्र मंडळ, पंचवटी व रणरागिणी महिला मंडळ, पंचवटी तैलीक महासभा, पचंवटी द्वारा आयोजित संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती समारोह. कार्यक्रमाचे ठिकाण : सिनर्जी हॉस्पिटल जबळ, गिता नगर, म्हसरुळ, पंचवटी, नाशिक दिनांक : रविवार ८ डिसेंबर २०१९
सनई - १२ ऑक्टोबर २०१९ रोजी साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्याचे श्री.क्षेत्र शिर्डी ता. राहता, जिल्हा-नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर एका विवाह समारंभात वधू-वर नाव नोंदणी फार्म देऊन एक आगळे वेगळे नाव नोंदणी अभियान नाशिक
साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राजगुरुनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा पांगारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हॅप्पी स्कूल प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, संताजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव कहाणे आदी उपस्थित होते. उपसरपंच भरत बुट्टे, अविनाश कोहिनकर व अविनाश कहाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश घोलप यांनी सूत्रसंचालन; तर प्रा. संदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त नगर शहरात दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने परिपत्रक काढून संताजींची जयंती उत्सव साजरा करण्याचे सूचित केले असून ही बाब समाजाच्या दृष्टीने उत्सवाचा आनंद व्दिगुणीत करणारी आहे. तरी समाजातील तिळवण तेली समाज ट्रस्ट, जिल्हा तेली समाज महासभा,श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, श्री संताजी विचार मंच, श्री.संताजी महिला मंडळ, श्री.संताजी नागरी सहकारी पतसंस्था व समाजातील बांधवानी यात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यात आली आहे.