Sant Santaji Maharaj Jagnade
नाशिक शहर तेली समाज वधु वर व पालक मेळावा
दि. 25 डिसेंबर 2017
मेळाव्याचे ठिकाण कै. यादवराव वाघ नगर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कतीक सभागह, भामा नगर, मुंबई नाका, नाशिक
फॉर्म पाठविण्याचा पत्ता - श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक 422 001, फोननं. 0253, 2576425
नाशिक कळवण तेली समाज - कनाशी संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संताजी युवक मंडळाच्या सहभागातून संताजी महाराजांच्या मुर्तीची मिळून काढण्यात आली.
नाशिक - ठाणगाव सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ठाणगाव इथे संताजी मित्रमंडळाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 129 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली
येथील मारुती मंदिरात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सूचनेचे युवानेते उदय सागळे जि प सदस्य वनिता शिंदे रामनाथ पावसे नामदेव शिंदे उपसरपंच शेखर कर्डिले सुधाकर कवडे अरुण केदार आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
![]()
- मोहन देशमाने, ओबीसी सेवा संघ
आर्यांच्या पुर्वी देशात मातृसत्ता कुटूंब पद्धत होती. त्याचे प्रतिक म्हणुन आजही देवी पुजली जाते. महाराष्ट्राची कुलदेवता म्हणुन भवानी माता आहे. तीचा शोध हा सिन्नर येथे राज्य करणार्या यादवा पासून सुरू होतो. सिन्नर, जुन्नर हे जवळ होते. आणी या वेळी तेली मंडळी येथून आपला पलंग भवानी मातेला घेऊन जात असावेत किंवा या समाजाला देवीचे सेवेकेरी म्हणून मान असावा. ती परंपरा आज ही घोडेंगावातून सुरू आहे. घोडनदीच्या काठावर वसलेले घोडेगाव. या गावचे चिलेकर, त्याही पुर्वी इतिहास सागतो आगदी शिवकाळात पुणे परीसरातील तेली बांधव आपला व्यवसाय संभाळून हातावर भाकरी घेऊन प्रसंगी स्वराज्यासाठी लढत पुण्याच्या पंचक्रोशीत तेली समाज आपली हुकमत ठेवून होता.
![]()
खरे तर वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शोष्णाच्या विरूद्ध एल्गार म्हणून होती. मनुवादी संस्कुतीची जोखडे तोडण्यास्तव केलेला प्रबोधनस्वरूपी किर्तनाचा जागर होता. धर्ममार्तंडांच्या जोखडातून भेाळया भाबडया अज्ञानी निरक्षर पिडलेल्या रयतेला मुक्तकरण्यासाठी चालविलेले ते मानवमुक्तीचे शांत व संयमी असे आंदोलन होते.याच वारकरी संप्रदायातील सूर्य म्हणून संताजी जगनाडे महाराजांचे नाव येते. एक क्रातीकारी पाऊल उचलणारे लढवय्येे योदधे म्हणून त्यांचे नाव शिल्पात कोरावयास हवे आहे.