Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाजा बाबत समज व गैरसमज.

तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 6)

    तेली समाजाची देशपातळीवरील तैलिक साहु महासभा 1947 च्या दरम्यान स्थापन झाली. त्यावेळे पासुन  सर्व जातींची यादी समाजा समोर होती. परंतु 2014 पर्यंत मोड (मोदी) तेली समाज नावाची पोटजात आहे हे माहित नव्हते. या समाजाशी तेली समाजाशी नाते काय ? हे तेथिल प्रसिद्धी लिखीत माध्यमात झाले आहे याची माहिती तेथील ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री. सोळुंकी यांनी दिली. यांनी सांगितलेली माहिती सत्य का असत्य हे शोधण्याची वेळ आता आली आहे. राजस्थान मधील एक राजा होता. त्याचया दरबारात ब्राह्मण समाजा एवढे बनिया समाजाला स्थान होते. 

दिनांक 11-06-2016 00:13:19 Read more

संघटनेचे रजीस्टेशन वादळाचे केंद्र होऊ शकले.

तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 5)

आज रजिस्टर केलेली तेली समाजाची संस्था या पुर्वी रजीस्टर केली होती. तिचे संघटनेने सभासद, अजिव सभासद बनविलले होते. असे अनेक बांधव स्पष्ट सांगतात. पुन्हा ही संस्था वेगळ्या नावाने रजिष्टर केली गेली. या प्रक्रियेत पहिल्या संस्थेच्या मंडळींनी निबंधाकडे हिशोब सादर केले  नसतील त्यामुळे प्रश्‍न उभे राहिले असतील. हे ही मान्य करु परंतु संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया बरेच दिवस सुर होती. त्या बाबत काही मिटींगा ही झाल्या. परंतु संघटनेच्या पदाधिकार्‍या समोर त्याचे म्हणजे घटनेचे वाचन झाले का ?  जर झाले असेल तर ते वादळ विनाकारण आहे. आणी फक्त काही विश्‍वासु मंडळींना दाखवुन नोंदी केली असेल तर वादळ योगयच म्हणावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडतो भारताची राज्यघटना म्हणजे संविधान जर प्रत्येकाने घेऊन वाचन केले तर देश जगात एक नंबरचा होईल.

दिनांक 11-06-2016 00:08:56 Read more

तिळवंणचं बोळवण, भुंकणारं कुत्र, गटारातील किडे हे वाक्य प्रयोग ?

तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 4)

       फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात एका बांधवांची भेट झाली आगदी त्यांनी दमबाज भाषेत सांगितले. बरे लिहा टिका लिहु नका. जर आसे घडलेच तर ते कुठे अडकवतील व कुठे संपवतील हे सांगता येणार नाही. दहशदवाद जो म्हणतो, दादागीरी जी म्हणतो ती हिच. तेली गल्ली मासिकाच्या सप्टेंबर 2013 च्या अंकात मी मांडले होते. (पवार व चव्हाण या नेत्याबाबत) असल्या दादागीरीचा पुरता तळपाट होतो. मराठा समाजाच्या दादागीरीचा शेवट काय झाला हे आपण पाहिलेत. मग समाज घडवायला निघलोत जाहिर सभेतगर्जना आपण करतो. तेली हा एक आहे हे पटवतो. काळानरुप वागा भेद गाडा म्हणातो पण प्रत्यक्ष काय ? कोयना नगर येथे जो तिळवणचे बोळवण करा सांगितले. पनवेल येथे कुत्र्याची उपमा दिली गेली. कल्याण येथे किडा मुंग्यांची उपमा दिली. ही व्यक्तव्य करणार्‍या पदाधीकारी बांधवांची भुमीका रास्त आहे ?

दिनांक 11-06-2016 00:03:22 Read more

तेली समाज महाराष्ट्र

    teli samaj महाराष्ट्रातील तेली समाजाचे आचारविचार आणि रूढी, प्रथा, परंपरा बहुजन समाजासारख्याच आहे. या समाजाच्या राज्यात साधारणत: २८ पोटशाखा आहेत. त्यात पंचम किंवा लिंगायत, कानडे, लाड, गुजर, अयार, कडू किंवा अकरमासे, कंडी, शनवार, शुक वार, राठोड, परदेशी, तिळवण आणि गंधी यांचा समावेश होतो. यापैकी तिळवण किंवा मराठे तेली या पोटजातींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर भारतात 700  पेक्षा अधिक पोटजाती आहेत. या समाजातील लोक सोमवारी काम करीत नाहीत म्हणून त्यांना ‘सोमवार तेली’ म्हणतात. याशिवाय समाजात अनेक पोटजाती आहेत. यात प्रामुख्याने मराठा तेली, देशकर तेली, क्षत्रिय तेली, एरंडेल तेली, बाथ्री तेली, साव तेली,  सावजी तेली, छत्तीसगडी तेली, साहू तेली, हालिया तेली, साडिया तेली, एक बादिया तेली, चौधरी तेली आदि तेली जातीच्या उपशाखा आहेत. मुस्लीम धर्मातील तेली समाजाला रोशनदार असे म्हटले जाते. नागपूर भागात प्रामुख्याने  एक बैले, दोन बैले किंवा तराणे आणि एरंडे अशा तेली समाजाच्या शाखा पोटशाखा आहेत. वर्धा जिल्ह्यात सावतेली हा समाज आदिवासी जमातीप्रमाणे राहतो, तर एरंडे तेली हे गावाबाहेर राहतात. साहू क्षत्रिय समाज विदर्भात मोठय़ा प्रमाणावर आहे.

दिनांक 07-06-2016 23:38:17 Read more

दिलीप दत्तात्रय शिंदे यांचा जीवनप्रवास (श्री संताजी प्रतिष्ठान सचिव)

       पूर्वी आमच्या आजोबाच्या काळात आमचे आजोबा गावाच्या आजुबाजूच्या परिसरातील गावे, वाड्यांमधून सावकार म्हणून प्रसिद्ध होते. आजोबाच्या काळात सुमारे १२०० एकर शेती होती. सर्व शेती पावसावर अवलंबून होती. परंतु पूर्वी पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने घरामध्ये धान्याच्या राशी लागत होत्या. आमचे घर म्हणजे १२ खण, ९६ पत्र्यांचा वाडा होता. इतक्या मोठे घर असून धान्य ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून सुमारे १५० पोती ज्वारी तळघरात साठवून ठेवावी लागत असे.

दिनांक 31-05-2016 18:25:05 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in