श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड हि मान्यताप्राप्त संस्था असुन संस्थेची सभासद संख्या दोन हजार पर्यंत आहे. संस्था दरवर्षी 26 जानेवारी ह्या दिवशीच हा कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेली आहे. आणि या कार्यक्रमाची पुर्ण कल्पना पुणे परिसरातील सर्व समाज बंधु भगिनींना असल्यामुळे सर्वजन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचे पत्रक वगैरे न काढता फक्त कार्यक्रमाचे स्थळ वेळ मॅसेज द्वारे पाठवीले जाते.
आणी 25 ते 0 टक्के प्रत्येक मतदार संघात विदर्भामध्ये तेली मतदार असल्याने लोकसभेत तेली मते निर्णायक ठरली. हीच रणनीती विधान सभेसाठी वापरुन विदर्भात भाजपा विजयी होऊ शकाला. मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांच्याच मतदार संघात तेली मतदान हे 35 ते 40 टक्के आहे. ही सर्व एक गठ्ठा मते फडणवीसांनाच मिळाली आहेत. या तेली समाजाने मते दिली म्हणुन भाजपा व फडणवीस सत्तेत गेले. गत वर्षात समाजाला काय दिले ? हा प्रश्न विचारणे समाजाचा अधीकार आहे. ओबीसी विद्यार्थींना ना फी दिली ना तेली समाजासाठी नविन विकास महामंडळ स्थापन केले. ना तेली सक्षम होईल अशी धोरणे राबवली. कायद्याच्या पळवाटा शोधून
महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासाचा ठेका घेतलेली संघटना व या संघटनेचे हाय कमांड ते पदाधिकारी एका तालात एका सुरात नेहमी एकच गाणे वाजवतात. आम्ही बारा टक्के आहोत. आम्ही तुमचे बारा वाजवु शकतो. या गाण्यातील हे जे कडवे आहे. ते मात्र सत्य आहे. कारण या कडव्यात खरी ताकद आहे. पण जसे हे गाणे लांबत जाते तसे समाजाचा शेवटचा बांधव त्याच गाळात अधीक रुतु लागतो. तेंव्हा उरते फक्त कडवे आणी याचा गाभा हवेत विरला जातो.
पुणे - महाराष्ट्र तैलीक महासभा ही गट, तट, भेद, हेकेखोर यात न गुंतता ती समाजाची रक्त वाहिनी बनावी या साठी तेली गल्ली मासिकाने विपुल लेखन केले. कारण ही समाजाची संघटना आहे. ती दुफळीत गुंतून समाजाचे नुकसान होऊ नये म्हणुन चांगल्या बाबींचे कौतुक व चुकांचा पंचनामा मांडला. काही सुज्ञ मंडळींनी ही आपले विचार इतर प्रसार माध्यमातुन मांडले. त्याला चांगले फळ येऊ लागले. समाजातील जेष्ठ बांधवांची सह विचार सभा मुंबई येथे संपन्न झाली. या ठिकाणी समाजात दुफळी होऊ नये म्हणुन मते मांडून त्या बाबत निर्णय प्रक्रिया सुरू झाली. त्या ठिकाण उपस्थीत असलेल्या मा. सौ. प्रिया महिंद्रे यांनी दिली. कारण तेली गल्ली हे मासीक हे शक्य तो संतुलन साधण्याचा प्रमाणिक प्रयत्न करते. कदाचीत आमची चुक असेल तर कळवा त्या विचारांना ही प्रसिद्धी देऊ.
चाकण :- समाज संघटन करून नेतृत्व साकारलेल्या सौ. निता करपे यांची निवड श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नुकतीच त्यांची निवड झाली.